04 March 2021

News Flash

ठाण्यात केवळ तीन टक्के  उपचाराधीन

रुग्णदुपटीचा कालावधी २७२ दिवसांवर; साप्ताहिक रुग्णवाढीचा वेगही कमी

(संग्रहित छायाचित्र)

रुग्णदुपटीचा कालावधी २७२ दिवसांवर; साप्ताहिक रुग्णवाढीचा वेगही कमी

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ९४ टक्क्य़ांहून अधिक करोनाबाधित बरे होऊन घरी परतले असून शहरात सध्या सव्वातीन टक्के करोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच करोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढल्याने मृत्युदर कमी होऊन २.३२ टक्के  झाला आहे. याशिवाय, रुग्णदुपटीचा कालावधी २७२ दिवसांवर पोहोचला असून प्रभाग समितीनिहाय साप्ताहिक रुग्णवाढीचा वेगही कमी झाला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४७ हजार ९९८ करोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ४५ हजार ३७२ (९४.५३ टक्के ) बाधित बरे झाले आहेत, तर शहरात सध्या १ हजार ५११ (३.१५ टक्के ) रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्याचे प्रमाण २.३२ टक्के  आहे. शहरात दररोज साडेपाच ते सहा हजारांच्या आसपास करोना चाचण्या करण्यात येत असून त्यामध्ये यापूर्वी दोनशे ते अडीचशे रुग्ण आढळून येत होते.

आता चाचण्या तितक्याच होत असताना रुग्णसंख्येत घट झाली असून आता दररोज १२५ ते १५० रुग्ण आढळून येत आहेत.

सध्या शहरात दररोज साडेपाच ते सहा हजारांच्या आसपास करोना चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ८.७२ टक्के  आहे. यापूर्वी ते दहा टक्क्य़ांच्या आसपास होते. याशिवाय, आठवडय़ाचा रुग्णवाढीचा वेग ०.३० टक्के  आहे. गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यामुळे शहरात करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र आहे.

प्रभाग समितीनिहाय साप्ताहिक रुग्णवाढीचा वेग

प्रभाग समिती    २५ ऑक्टोबर      ९ नोव्हेंबर

माजिवाडा           ०.९  टक्के         ०.४  टक्के

वर्तकनगर           ०.७ टक्के           ०.४  टक्के

उथळसर              ०.६ टक्के           ०.३  टक्के

दिवा                    ०.७ टक्के           ०.३  टक्के

कळवा                 ०.६  टक्के           ०.४  टक्के

नौपाडा                  ०.७  टक्के          ०.३   टक्के

लोकमान्यनगर-

सावरकरनगर      ०.६  टक्के      ०.३  टक्के

वागळे इस्टेट       ०.६  टक्के      ०.२  टक्के

मुंब्रा                    ०.४  टक्के      ०.१  टक्के

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 3:07 am

Web Title: more than 94 percent covid 19 patients recovered in thane zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कंदिलांच्या मागणीत ७५ टक्क्यांनी घट
2 कल्याण-डोंबिवलीत प्रशासकीय राजवट
3 पोलीस दफ्तरी फक्त ५३ नायजेरियन
Just Now!
X