रुग्णांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ३१ ते ५० वयोगटाचे सर्वाधिक म्हणजेच ४० टक्के करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्या खालोखाल ५० वयोगटाच्या पुढील ३७ टक्के रुग्ण आहेत. एकूण रुग्ण संख्येमध्ये पुरुष रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, तर शहरात आतापर्यंत चारशेहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ५० वयोगटाच्या पुढील २८९ रुग्णांचा समावेश आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून शहरात दररोज तीनशे ते चारशे रुग्ण आढळून येत आहेत. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ११ हजार ७०५ रुग्ण आढळून आले आहेत.

त्यापैकी ५ हजार ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर उर्वरित ६ हजार २४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांचे वयोगटानुसार महापालिका प्रशासनाकडून विश्लेषण केले असून त्यात करोनाची लागण होण्यामध्ये पुरुषांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.

वयोगटानुसार रुग्णसंख्या

वयोगट             पुरुष     महिला     टक्केवारी      मृत्यू

१० वर्षां पर्यंत     १४६         १२७       २.३               ०

११ ते २०             २४६         २१०       ३.९               १

२१ ते ३०             १०८१       ८१७       १६.२            १०

३१ ते ४०              १५७२      ७९०        २०.२            २५

४१ ते ५०              १४८६      ८५७         २०               ७२

५१ ते ६०               १४७७      ८२१         १९.६           १०९

६० वर्षांच्या पुढे      १२६२    ८०३          १७.६             १८०