घटस्फोट झाल्यानंतर पती जास्त पोटगी देत नसल्याच्या कारणावरून एका महिलेने स्वत:च्या तीन वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंब्रा येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हीना शेख (२५) या महिलेला अटक केली आहे.

हीना शेखचे चार वर्षांपूर्वी  फैयाज शेख याच्या सोबत लग्न झाले होते. मात्र, काही कारणांवरून जानेवारी २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मुलाचा ताबा हीना हिच्याकडे देण्यात आला होता. सोमवारी तिने मुलाला घरामध्ये नग्न करून बेदम मारहाण केली. या मारहाणीचे तिने मोबाइलमध्ये चित्रीकरणही केले. हे चित्रीकरण तिने फैयाज यांना मोबाइलवर पाठविले आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटस्फोटानंतर फैयाज हे तिला दरमहा सहा हजार रुपये पोटगी देत होते. मात्र, तिला दहा हजार रुपयांची पोटगी हवी होती. यासाठीच तिने मुलाला मारहाण करून त्याचे चित्रीकरण फैयाज यांना पाठविल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती मुंब्य्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एस. कड यांनी दिली.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस