६ डिसेंबपर्यंत टप्प्याटप्प्याने सेवा बंद; पालिकेची या मार्गावर परिवहन सेवा

वसई-विरार शहरातील एसटी सेवा अखेर एसटी महामंडळाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मार्गावरून एसटी सेवा बंद करण्यात येणार आहे, ते मार्ग महापालिकेकडे हस्तांतरित केले असून यापुढे पालिकेची परिवहन सेवा येथे असेल, असे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. महापालिकेला वेळ मिळावा यासाठी सरसकट सेवा बंद न करता टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. मात्र एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे वसईकर प्रवाशांमध्ये संतापाची भावना पसरली आहे.

mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
osho marathi news, osho aashram pune marathi news
ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा तडाखा, पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली
supreme court
‘डीजेबी’ला निधी जारी करण्याचे निर्देश
1311 objections to the proposed Shaktipeeth Highway
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोधासाठी १३११ हरकती

वसई-विरार शहरातील एसटी सेवेबाबत उच्च न्यायालयात प्रकरण सुरू होते. एसटीने शहराच्या ग्रामीण भागातील सेवा बंद करू नये यासाठी जनआंदोलन समितीने डॉमनिका डाबरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यातील एका याचिकेवर नुकताच न्यायालयाने निर्णय दिला. त्या निर्णयाचा आधार घेत एसटीने वसईच्या ग्रामीण भागातील एसटी सेवा सोमवारपासून बंद केली आहे. विद्यार्थी आणि पासधारकांसाठी काही ठिकाणी बससेवा तुरळक प्रमाणात सुरू ठेवण्यात आल्या आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वी नालासोपारा आगारातील एका कोपऱ्यात भित्तीपत्रकाद्वारे याची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्याबाबत कोणत्याही प्रवाशाला समजले नाही. सोमवारी पश्चिम पट्टय़ातील बस बंद झाल्याने प्रवाशांना याबाबत समजले आणि संतापाची भावना पसरली. कळंब, भुईगाव, राजोडी, सत्पाळा, आगाशी या मार्गावरील सेवा बंद करण्यात आली आहे. ६ डिसेंबरनंतर वसईच्या पश्चिम पट्टय़ातून एसटी सेवा पूर्णपणे बंद केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागरिकांना बस सेवा देणे हे पालिकेचे काम आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही वसईच्या ग्रामीण भागातही आमची परिवहन सेवा सुरू ठेवणार आहोत, असे महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले.

‘हा जनतेचा विश्वासघात’

एसटीने न्यायालयाच्या आदेशातून पळवाट काढत एसटी बंद करणे हा प्रवासी जनतेचा विश्वासघात असल्याचे जनआंदोलन समितीने म्हटले आहे. एसटी आणि पालिका या दोघांनीही सेवा सुरू ठेवावी, असे न्यायालयाने सांगितले आहे. मात्र तरीही एसटीने सेवा बंद करण्यास सुरुवात केली, असा आरोप जनआंदोलन समितीच्या प्रफुल्ल ठाकूर यांनी केला. आम्ही या प्रश्नावर पुन्हा जनतेला एकत्र करून कायदेशीर मार्गाने लढा देऊ , असे जनआंदोलन समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानंतर एसटीचे मार्ग महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आले आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशात आम्हाला सेवा देणे बंधनकारक नाही. महापालिकेने या गावात सेवा देण्याची तयारी दर्शविल्याने आम्ही टप्प्याटप्प्याने एसटी सेवा बंद करत आहोत.

– अजित गायकवाड, पालघर जिल्हा एसटी नियंत्रक

एसटीचे मार्ग बंद करण्याचे लेखी आदेश विभागीय नियंत्रकाकडून आलेले आहेत. त्यानुसार आम्ही मार्ग बंद करत आहोत. विद्यार्थी आणि पासधारकांची गैरसोय होऊ  नये यासाठी टप्प्याटप्प्याने एसटी सेवा बंद करत आहोत.

– दिलीप भोसले, आगारप्रमुख, नालासोपारा

उच्च न्यायालयाच्या आदेशानानुसार एसटीच्या मार्गावर महापालिकेची परिवहन सेवा देणार आहोत. ज्या ठिकाणी एसटी मार्ग बंद होईल, त्या सर्व मार्गावरून पालिकेच्या बस धावतील.

– सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महापालिका