News Flash

मागाल ते पुस्तक घरपोच!

मुद्रा बुक डेपो या पुस्तक विक्रीच्या दुकानाने ‘मागाल ते पुस्तक घरपोच’ ही योजना सुरू केली आहे

मागाल ते पुस्तक घरपोच!
वसई-विरारमधील अनेक वाचक आता दूरध्वनी आणि फेसबुकमार्फत मुद्रामधून पुस्तक मागवीत आहेत.

विरारमधील पुस्तक विक्री दुकानाचा अनोखा उपक्रम

मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विरारमधील मुद्रा बुक डेपो या पुस्तक विक्रीच्या दुकानाने ‘मागाल ते पुस्तक घरपोच’ ही योजना सुरू केली आहे. याशिवाय राज्यातीलकुठल्याही प्रकाशाचे दुर्मीळ पुस्तक उपलब्ध करून देण्याचा दावाही केला आहे. वसई-विरारमधील अनेक वाचक आता दूरध्वनी आणि फेसबुकमार्फत मुद्रामधून पुस्तक मागवीत आहेत.

मनोरंजनाची विविध साधने, समाजमाध्यमाचा अतिवापर यामुळे वाचनाची आवड कमी होऊ  लागली आहे. इंग्रजीच्या वाढत्या प्रस्थामुळे मराठीचे वाचन कमी होऊ  लागले आहे. अशा वेळी मराठी भाषा आणि साहित्य टिकवणे हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विरारमधील राजू नाईक यांचे मुद्रा बुड डेपो हे पुस्तकांचे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून वाचकांना शब्दसाहित्याची भूक भागवत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे पुस्तक विक्रीचा व्यवसाय करणे जिकिरीचे आणि कठीण काम होते. परंतु मराठीच्या ध्यासासाठी ते हा वसा चालवत होते. पण आता त्यापुढे जाऊन त्यांनी वाचक वाढविण्यासाठी अभिनव योजना सुरू केली आहे. कुठलेही पुस्तक त्याच किमतीत तसेच सवलतीच्या किमतीत घरपोच पोहोचविण्याची ही योजना आहे. फेसबुक, दूरध्वनी किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून पुस्तके मागविता येणार आहे. विशेष म्हणजे राज्यातल्या कुठल्याही प्रकाशकाकडे वाचकांनी मागणी केलेले पुस्तक असेल तर ते हमखास मिळणारच असा दावाही त्यांनी केला आहे.

या अभिनव योजनेबाबत बोलताना नाईक यांनी सांगितले की, घरपोच पुस्तके देणे हे तसे न परवडणारे आहे. परंतु मराठी वाचक टिकावा, मराठी साहित्य जगावे यासाठी आम्ही हा प्रयोग सुरू केला आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळतो आहे.आम्हाला पुस्तकाचे नाव फोनवरून सांगितले तर आम्ही त्या ग्राहकाच्या सोयीनुसार त्यांच्याकडे घरपोच पोहोचवतो.

दुर्मीळ पुस्तके देण्याचा दावा

वसई-विरारमधील नागरिकांना पुस्तके घेण्यासाठी मुंबईला जावे लागायचे. पण मुद्राने मुंबईत किंवा राज्यात मिळणारी सर्व पुस्तके देण्याचा दावा केला आहे. कोणत्याही दुर्मीळ पुस्तकांची मागणी वाचकांनी केली की ती आम्ही देतो. जर आम्ही देऊ  शकलो नाही तर संपूर्ण राज्यात कुठलाही पुस्तक विक्रेता ते देऊ  शकणार नाही असा दावाही त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 12:51 am

Web Title: mudra book depot launched book home delivery scheme
Next Stories
1 शहरबात : करवाढ फायद्याची?
2 अल्पवयीन मुलावर वर्गमित्राकडून लैंगिक अत्याचार
3 अनैतिक संबंधाच्या रागातून हत्या
Just Now!
X