News Flash

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गॅस टँकरचा टायर फुटला.

या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक मंदावली आहे.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी गॅस टँकरचा भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गॅस टँकरचा टायर फुटला. चारोटी- गुलजारी पुलाजवळ ही घटना घडली. टायर फुटल्याने चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर पुलावरुन खाली कोसळला. या अपघातात टँकरने दुचाकीला धडक दिली होती. यात दुचाकीवरील दोन जण आणि टँकर चालक गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक मंदावली आहे. गॅस टँकरचा अपघात झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2019 10:35 am

Web Title: mumbai ahmedabad national highway gas tanker hits bike 3 injured tyre burst charoti
Next Stories
1 सेना-भाजपमध्ये टोलसंघर्ष
2 नव्या स्थानकांची ‘रखड’गाडी
3 तीन हात नाक्याची मेट्रोमुळे कोंडी
Just Now!
X