News Flash

महिलेसह मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ

पोलिसांना पाचारण केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

मीरा रोड येथील गोल्डन नेस्ट परिसरातील एका इमारतीत २९ वर्षीय महिलेचा तिच्या नऊ वर्षीय मुलीसह कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरातून दरुगधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

सोनम सरोवर या इमारतीत राहणाऱ्या दीपिका संघवी आणि त्यांची मुलगी हित्वी यांचे मृतदेह ते राहात असलेल्या चौथ्या मजल्यावरील घरात सापडून आले. दीपिका यांचा मृतदेह घराच्या हॉलमध्ये आणि हित्वीचा मृतदेह चादरीत गुंडाळून पलंगामध्ये ठेवण्यात आला होता. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या दीपिका या पतीशी घटस्फोट झाल्याने आपल्या मुलीसह एकटय़ाच या इमारतीत राहात होत्या. मृतदेह अतिशय सडलेल्या अवस्थेत सापडल्याने या दोघींची हत्या करण्यात आली आहे का याबाबत लगेचच निष्कर्ष काढणे कठीण असले तरी दीपिका यांच्या डोक्याला मार लागल्याचे तसेच हित्वी हिचा गळा आवळला  असल्याची शक्यता असल्याचे  प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने थंड डोक्याने या हत्या करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत नक्की सांगता येईल असे पोलिसांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 12:15 am

Web Title: mumbai crime news 16
Next Stories
1 खंडणीच्या आरोपात मीरा-भाईंदरच्या भाजप आमदाराविरुद्ध FIR दाखल
2 ‘प्रभाग’फेरी : वागळेची दुनिया..समस्यांच्या गर्तेत
3 टोप्या, मफलर आणि झेंडे सज्ज!
Just Now!
X