20 November 2019

News Flash

सूरज परमार प्रकरण: ‘त्या’ चार नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन मंजूर

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणी संशयित असलेल्या चारही नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. यापूर्वी नगरसेवक विक्रांत चव्हाण, नजीब

सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या तपासणी अहवालातून नगरसेवक विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण या चौघांची नावे पुढे येताच पोलिसांनी त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली होती

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणी संशयित असलेल्या चारही नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला. यापूर्वी नगरसेवक विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण या चौघांनी अटकपूर्व जामिनाकरिता दाखल केलेले अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे या चारही नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. प्रत्येकी १ लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या काळात या नगरसेवकांना ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.
सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या तपासणी अहवालातून नगरसेवक विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण या चौघांची नावे पुढे येताच पोलिसांनी त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांची पथके त्यांच्या मागावर असून हे चौघेही फरार आहेत.

First Published on November 3, 2015 1:50 pm

Web Title: mumbai high court give pre arrest bail to four corporators involved in suraj parmar suicide case
Just Now!
X