मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या एकूण ३५ लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. या लोकल दुरुस्त करून टप्प्याटप्प्याने सेवेत आणल्या जात आहेत. मात्र तोपर्यंत मध्य आणि हार्बर मार्गावर नेहमीपेक्षा कमी लोकल सेवा उपलब्ध होणार आहेत. म्हणजेच काही लोकल सेवा या रद्द असणार आहेत. यामुळे पुढील दोन दिवस लोकल प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या सीएसएमटी ते टिटवाळापर्यंत लोकल चालवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अप मार्गावरील कामात अडथळे येत आहेत. फक्त एकाच मार्गावरून एक्स्प्रेस चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे शहापूर-कसारापर्यंत लोकल सुरू होण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत.