News Flash

भाईंदरमध्ये भल्या पहाटे अज्ञातांनी पेटवून दिल्या ४ खाजगी बसेस

कारण अद्याप अस्पष्ट, नागरिकांमध्ये वेगळ्याच प्रकरणाची कुजबुज

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता वार्ताहर,

भाईंदर पश्विमेच्या रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरात चार खाजगी बस गाड्या अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत बसेस जळून पूर्णपणे खाक झाल्या. शनिवारी पहाटे सूर्योदयाच्या आधी ही घटना घडली. मागील आठवड्यात एका खाजगी बसमध्ये चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्या प्रकरणाचा संबंध लावत ही आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

भाईंदर पश्विम परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी बस गाड्या उभ्या असतात. शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास चार बस गाड्यांना आग लावून पेटवून टाकण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीत आटोक्यात आणली. आग कुणी आणि का लावली? त्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र मागील आठवड्यात एका खाजगी बसमध्ये ४ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे ही आग लावण्याचे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तपास करणाऱ्या पोलिसांनी मात्र या दोन प्रकरणांचा संबंध असल्याच्या चर्चांना दुजोरा दिलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 1:44 pm

Web Title: mumbai shocking incidence private buses set on fire near bhayander railway station police investigation on the way vjb 91
Next Stories
1 ठाण्यात दररोज १० हजार डोस
2 ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांचा शोध सुरू
3 Coronavirus : ठाण्यात करोना आटोक्यात