25 October 2020

News Flash

दळण आणि ‘वळण’ : जरा पूर्वेकडे चला..!

पूर्व-पश्चिम पॅटर्न स्वीकारल्यानंतरही मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा घोळ कायमच आहे.

 

सन्य पोटावर चालते असे म्हणतात; मात्र मुंबईकर चाकांवर चालतात. म्हणूनच वाहतूक व्यवस्था हा व्यापक, समाजव्यवस्थेशी निगडित असा प्रश्न आहे. प्रगत देशांत या प्रश्नांकडे गांभीर्याने आणि संवदेनशीलतेने पाहिले जाते. युरोप-अमेरिकेत वाहतूक हा विषय सम्रगपणे आणि र्सवकषपणे हाताळला जातो. सरकारी धोरणे, नियोजन आणि अमलंबजावणी यांत सुसूत्रता असते. त्याचप्रमाणे वाहतूक या विषयाचा मूलभूत विचारही अनुस्यूत असतो. केवळ सरकारच नव्हे तर नागरिक संघटना, विद्यापीठे आणि वाहतुकविशारद यांचा नियोजनात आणि अमलंबजावणीत सक्रिय आणि महत्त्वाचा सहभाग असतो. मुळातच प्रगत देशात वाहतूक ही समस्या नसून ती एक मूलभूत नागरी सुविधा आहे, असा विधायक विचार केला जातो. आपल्याकडे मुळातच हा दृष्टिकोन नसल्यामुळे वाहतूक प्रश्नाचे चाक चिखलात रुतले आहे.ु

उदाहरण देऊन मुद्दा स्पष्ट करायचे झाल्यास मुंबईच्या उत्तर-दक्षिण आणि दक्षिण उत्तर वाहतूक पद्धतीविषयी बोलता येईल. अनेक दशके सकाळी उत्तर-दक्षिण आणि सायंकाळी दक्षिण-उत्तर अशी एकरेषीय वाहतूक व्यवस्था आपल्याकडे आहे. हा ताण कमी करण्यासाठी प्रशासन आणि वाहतूक व्यवस्थापनतज्ज्ञांनी जोगेश्वरी-विक्रोळी िलक रोड आणि सांताक्रुझ-चेंबूर िलक रोड या मार्गाचा पर्याय दिला. त्यामुळे पूर्व-पश्चिम वाहतूक सुरू झाली. मुंबईच्या वाहतुकीचा जटिल प्रश्न काही प्रमाणात तरी सुटेल आणि मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. पंरतु वास्तव मात्र फार वेगळे आहे.

पूर्व-पश्चिम पॅटर्न स्वीकारल्यानंतरही मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा घोळ कायमच आहे. हे कटू वास्तव आहे. जोगेश्वरी-विक्रोळी िलक रोड आणि सांताक्रुझ-चेंबूर िलक रोड या मार्गावर गेल्या काही वर्षांत कित्येक पटीने वाहतूक कोंडी वाढली आहे. यात ९० ते ९५ टक्के खासगी वाहने या मार्गावर धावत आहेत, तर सार्वजनिक वाहतुकीतील महत्त्वाचे साधन असलेल्या बेस्ट गाडय़ांनी मात्र १० ते १५ टक्के प्रवासी वाहतूक केली जात आहे. आणि यावर नजीकच्या काळात काही कठोर आणि दूरगामी उपाययोजना होणे फार कठीण आहे. म्हणूनच रोगापेक्षा उपाय भंयकर अशी वाहतूक व्यवस्थेची गत झाली आहे. मूळ प्रश्न नियोजनाचा आहे. मुंबईची लोकसंख्या, भौगोलिक रचना, रस्त्यांची अवस्था, आणि वाहनाची वाढती घनता असा एकत्रितपणे विचार न केल्यामुळे या प्रश्नाचे राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला नीट आकलन झाल्याचे दिसत नाही.

एखादी योजना कागदावरून प्रत्यक्षात येत असताना बराच कालापव्यय होतो. दरम्यानच्या काळात लोकरीचा गुंडा सुटत सुटत जावा, तशी मुंबईची लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढत जाते आणि त्याच प्रमाणात वाहनांची संख्याही वाढत जाते, त्यामुळे योजनेचा बोजवारा उडतो आणि मुळ प्रश्न एखाद्या हट्टी मुलाप्रमाणे पिरपिरत राहतो. हा आजवरचा इतिहास आहे. मागील चुकांतून शिकण्याचे तारतम्य ना प्रशासनाकडे आहे, ना राज्यकर्त्यांकडे.

सध्या मुंबई व उपनगरात २० लाख दुचाकी तर आठ लाख चारचाकी वाहने रस्त्यावर धावत आहेत. यात दरवर्षी एक लाख दुचाकी आणि ४० हजार चारचाकींची भर पडत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न येत्या १० वर्षांत उग्र रूप धारण करेल, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. गरज आहे, काटेकोर नियोजनाची आणि त्याहून अधिक काटकोर अंमलबजावणीची. उदाहरणार्थ- खासगी वाहनांवर जबरदस्त कर बसवणे त्याचप्रमाणे पाìकग शुल्क आकारणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे, पदपथांची व्यवस्था करणे अशा काही पर्यायांचा वाहतूकविशारद गेली अनेक र्वष जोरदार आग्रह धरत आहेत, असे केल्यामुळे वाहनाची प्रतिचौरस किलोमीटर घनता मोठय़ा प्रमाणात कमी होईल, असा अंदाज आहे. परंतु राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे या पर्यायांकडे राज्यकर्ते साफ दुर्लक्ष करत आहेत.

सवंग लोकप्रियतेची कास धरल्यामुळे राजकीय नेतृत्वाला वाहतूक कोंडी या प्रश्नावर कठोर आणि दूरगामी निर्णय घेणे जड जात आहे. ‘लोक गाडय़ा घेत आहेत, तर घेऊ दे’, असा विचार राज्यकत्रे करत असल्याने या प्रश्नाची तड लागत नाही. सध्या केवळ एकरेषीय म्हणजेच (उत्तर-दक्षिण आणि दक्षिण-उत्तर) रेल्वे आणि बेस्ट गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येचा विचार केल्यास सुमारे एक कोटी पाच लाख प्रवासी रोज प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर प्रचंड ताण निर्माण होतो. यावर सरकारने सर्वप्रथम पूर्व-पश्चिम माíगकेला अग्रक्रम दिला पाहिजे. तिथल्या वाहतुकीची व्यवस्था उत्तमपणे लागली तर रस्त्यावरील कोंडी सुटेल विशेषत: जोगेश्वरी-विक्रोळी िलक रोड आणि सांताक्रुझ-चेंबूर िलक रोड या माíगकांचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे. यात बेस्ट बस गाडय़ांचा पर्याय स्वीकारला पाहिजे. एका खासगी वाहनात सर्वसाधारण चार प्रवासी बसतात, तर बेस्ट गाडीत ९ पट जास्त बसू शकतात. त्यामुळे अशा माíगकांवर बेस्टचा पर्याय स्वीकारला पाहिजे हे उघड आहे. किंवा खासगी वाहनांनी ‘कारपूल’चा पर्याय स्वीकारला पाहिजे. त्यामुळे वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल आणि मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होईल.

पूर्व-पश्चिम माíगकेत गोरेगाव-मुलुंड, बोरिवली-ठाणे, पनवेल-विक्रोळी, शिवडी-न्हावा-शेवा बंदर, सीवूड-चेंबूर, घणसोली-विक्रोळी असे जाळे वाढवले पाहिजे. त्यामुळे उत्तर-दक्षिण या एकरेषीय वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल. यात अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेप्रमाणे आणखी प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे उपनगरीय वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. गेली पन्नास-साठ वर्षे मुंबईकरांनी दक्षिण-उत्तर आणि उत्तर-दक्षिण असाच प्रवास केला आहे. त्यामुळे वाहतुकीचा एका ढाचा नक्की झाला हे खरे. परंतु त्यामुळे प्रशासन नियोजन करते म्हणून प्रवासी संघटना आणि नागरिक संघटना एका ठरावीक साच्यात वाहतुकीच्या प्रश्नाचा विचार करीत होती. त्यामुळे वाहतुकीच्या प्रश्नाचे उत्तरही कोंडीत सापडले होते. आता पूर्व-पश्चिम हा एक पर्याय आपल्यासमोर आहे. त्याचा सर्व बाजूंनी साधकबाधक विचार झाला पाहिजे. मुंबई हे शहर सर्वागाने वाढते आहे आणि वाढणार आहे. एकाच चाकोरीत न अडकता आणि रुळलेल्या आणि मळलेल्या वाटावर न चालता राज्यकर्त्यांनी पूर्व-पश्चिम माíगकांचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. म्हणून जा जरा पूर्वकडे हेच सध्याच्या वाहतूक कोंडीचे उत्तर आहे, असे म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 1:25 am

Web Title: mumbai transport problem
Next Stories
1 मासळी महागणार?
2 पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक
3 शाळा ताब्यात नसतानाही कोटय़वधींची तरतूद
Just Now!
X