13 July 2020

News Flash

मुंब्रा चौपाटीला गती!

रेती बंदरला समांतर ४० मीटरचा सेवा रस्ता तयार करून ठाणेकरांसाठी चौपाटी तयार करण्यात येत आहे.

आता रेती बंदरला समांतर ४० मीटरचा सेवा रस्ता तयार करून ठाणेकरांसाठी चौपाटी तयार करण्यात येत आहे.

रेतीबंदर सुशोभीकरणासाठी जिल्हा प्रशासनाकडून पालिकेला दोन कोटी रुपये

मुंब्रा ते कळवा दरम्यानच्या खाडीकिनारी महापालिकेच्या वतीने राबविल्या जात असलेल्या चौपाटी प्रकल्पात खाडीकिनारा सुशोभीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडे पर्यटन विकासाचा भाग म्हणून दोन कोटी रुपये सुपूर्द केले आहेत. तसेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शासनाकडे ३० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. जिल्ह्य़ाच्या वार्षिक आराखडय़ास मान्यता मिळण्यासाठी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रेतीबंदर प्रकल्पाचे सादरीकरण केले.

मध्यंतरी खाडीकिनाऱ्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जिल्हा प्रशासनासमवेत संयुक्तरीत्या मोहीम राबवून अतिक्रमणे हटवली होती. मुंब्रा-खारेगाव-कळवा दरम्यानच्या रेतीबंदर परिसरामध्ये विस्तीर्ण खाडीकिनारा आणि लगत उंच डोंगररांगा असा निसर्गाचा अनमोल ठेवा पाहायला मिळतो. गेल्या काही वर्षांमध्ये खाडीकिनाऱ्यावरील अतिक्रमणामुळे या भागातील सौंदर्याला बाधा येण्यास सुरुवात झाली होती. रेतीबंदर भागात रेती उपसा करणाऱ्या व्यावसायिकांनी सहकारी सोसायटी स्थापन करून खाडीकिनाऱ्यावरील जागा रेती साठवणुकीसाठी जागा मागितली होती. त्यानुसार महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डातर्फे त्यांना भाडेपट्टय़ाने ही जागा सोसायटी व रेती उत्पादक व्यावसायिकांना देण्यात आली होती. या ठिकाणी स्थानिक लोक रेती साठवणूक करीत होते. कालांतराने हा व्यवसाय बंद होऊन तेथे गॅरेज, हॉटेल्स, वर्कशॉप्स अशी दुकाने सुरू झाली आणि हा परिसर खूप बकाल झाला होता. तसेच अतिक्रमणे होऊन परिसराची रया गेली होती. ती अतिक्रमणे हटविण्यात आली.

आता रेती बंदरला समांतर ४० मीटरचा सेवा रस्ता तयार करून ठाणेकरांसाठी चौपाटी तयार करण्यात येत आहे. कळवा परिसरात एकही विरंगुळ्याचे ठिकाण नाही. चौपाटीमुळे समस्त ठाणेकरांना एक चांगले विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 1:42 am

Web Title: mumbra chowpatty chowpatty on the kalwa mumbra creek
Next Stories
1 बदलाच्या क्षितिजावर मिळून सातजणी..
2 बेकायदा बांधकाम जमीनदोस्त
3 कुष्ठरोगापुढे न झुकता स्वाभिमानाने जगण्याचा लढा!
Just Now!
X