ठाणे शहरातून दरवर्षी कब्बड्डी, खो-खो, जलतरण, ज्युडो, कराटे, तायक्वांन्दो, जिम्नॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, तलवारबाजी, नेमबाजी, बॅडमिंटन, टेबलटेनिस, मल्लखांब यासारख्या क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्य दाखविणाऱ्या खेळाडूंचे प्रमाण लक्षणीय आहे. या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये दरवर्षी प्रत्येकी सरासरी दहाहून अधिक दर्जेदार खेळाडू तयार होत आहेत. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या कौशल्यांचे दर्शन घडवून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या खेळांडूना शहरात मात्र दुर्लक्षाचे धनी व्हावे लागते. खेळासाठी आवश्यक सुविधांची उपलब्धता नसल्याने उपलब्ध साधनांच्या मदतीने ठाण्यातील खेळाडूंना सराव करावा लागत आहे. काही खेळाडूंना अत्याधुनिक सुविधांसाठी मुंबईतील साई किंवा पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलांमध्ये धाव घ्यावी लागते. त्यामुळे सरावासाठी ठाण्याबाहेर जाणाऱ्या खेळाडूंना महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे.

ठाणे शहरातील एकमेव मैदान अशी ओळख असलेले दादोजी कोंडदेव क्रीडांगण हे शहरातील अनेक खेळाडूंना हक्काचे स्थान आणि एकमेव आधार आहे. हे क्रीडांगण वगळल्यास शहरात इतर भागामध्ये सरावासाठी खेळाडूंना इतकी विस्तृत जागा उपलब्ध नाही. क्रिकेटचा सराव असो किंवा अ‍ॅथलॅटिक्सची सराव शिबिरे; खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध असलेल्या या भागात मनाप्रमाणे सराव करता येतो. असे असले तरी या सरावादरम्यान अनेक अडथळ्यांचा सामना या खेळाडूंना करावा लागतो. क्रिकेट सरावासाठी अडथळे कमी असले तरी अ‍ॅथलेटिक्सच्या सरावासाठी या भागात अनेक र्वष सिंथेटिक्सट्रॅक उपलब्ध नव्हता. या ट्रॅकच्या मागणीसाठी क्रीडा प्रशिक्षकांनी गेल्या वीस वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. कधी एखादा नगरसेवक त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यायचा, मात्र अपुऱ्या निधीमुळे ट्रॅकचे काम पूर्ण होत नव्हते. अनेक र्वष उन्हापावसात आणि चिखलमाती तुडवत खेळाडूंनी सराव सुरूच ठेवला. पावसाळ्यातील चिखल टाळण्यासाठी स्टेडिअमच्या पायऱ्यांवर सराव करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना पाहिल्यानंतर अस्सल क्रीडाप्रेमी हळहळल्याशिवाय राहात नव्हता. मात्र हे दुष्टचक्र खेळाडूंसमोर कायम होते. ठाण्यातील आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या प्रशासनाच्या मदतीने या मैदानात सिंथेटिक ट्रॅ्रक उभारण्यासाठी निधी देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. त्याला यश मिळून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने सुमारे एक कोटींच्या आसपास निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून काम सुरू होण्यासाठी मात्र मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर गेल्या फेब्रुवारीमध्ये अखिल भारतीय नाटय़संमेलनाची सांगता झाल्यानंतर या कामाला सुरुवात झाली. मात्र सिंथेटिक ट्रॅक प्रकल्पाचे भूमिपूजनही प्रशिक्षक आणि महापालिकेच्या वादाने गाजले. सुरुवातीला हा ट्रॅक मैदानामध्ये तयार करण्याचे ठरले. त्यासाठी क्रीडांगणाची संरक्षण भिंत हटविण्यात आली. मात्र मैदानामध्ये ट्रॅक झाल्यास पावसाळ्यात त्याचा उपयोग होऊ शकला नसता. पावसाचे पाणी आणि चिखलांमुळे हा ट्रॅक बंद झाला असता. म्हणून प्रशिक्षकांनी तो स्टेडिअमच्या पायऱ्यांवर तयार करण्याची मागणी केली. त्यानुसार पायऱ्यांवर ट्रॅक टाकण्यात आला. मात्र हा ट्रॅक अत्यंत अरुंद असल्याने त्याचा फटका अ‍ॅथलॅटिक्स खेळाडूंना बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशिक्षकांनी याविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. योग्य नियोजन आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांची मदत न घेतल्याने महापालिकेच्या सिंथेटिक ट्रॅकचे नियोजनच चुकले आहे. त्याचा फटका भविष्यात हजारो खेळाडूंना बसणार आहे. याचा दोषारोप महापालिका क्रीडा विभागावरच होत आहे.
शहराबाहेर जाण्याची नामुष्की..
दादोजी कोंडदेव क्रीडांगणावरील सिंथेटिक ट्रॅकवर पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध झाली नाही तर खेळाडूंना ‘गवत’ तसेच ‘माती’वर धावावे लागणार आहे. त्या भागातील खड्डय़ांचा सामना करावा लागत असून त्यामुळे अ‍ॅथलीट्सना दुखापतींची चिंता सतावत असते. शहरात अन्य ठिकाणीही सिंथेटिक ट्रॅकची वानवा असल्याने ठाण्यातून मुंबई विद्यापीठाच्या मरीन लाइन्स येथील सिंथेटिक ट्रॅकवर सरावासाठी जावे लागते. त्यासाठी महाविद्यालयातून सुट्टी घ्यावी लागते. स्पर्धेच्या सरावासाठी दूरच्या सिंथेटिक ट्रॅकचा आधार घेताना वेळेचा अपव्यय होऊन त्याचा अभ्यासावरही परिणाम होत असतो. तसेच मुंबई, पुण्याच्या सिंथेटिक ट्रॅकवर सरावासाठी जाण्यात अ‍ॅथलीट्सना प्रवासाची दगदग तसेच आर्थिक भार उचलावा लागतो. अनेकांना हा खर्च परवडत नाही. दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर सिंथेटिक ट्रॅक उपलब्ध झाला असला तरी त्याचा फारसा फायदा खेळाडूंना होईल, अशी परिस्थिती मात्र अद्याप निर्माण झालेली नाही.

Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
Appointment of financial institution
विरार-बोळींजमधील घरांच्या विक्रीसाठी वित्तीय संस्थेची नियुक्ती

अन्य क्रीडांगणांची अवस्था
ठाण्यात मिनी स्टेडियम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, इनडोअर अ‍ॅकॅडमी अशा वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या घोषणा होत असल्या तरी त्यातील अनेक गोष्टी आजही कागदावरच आहेत. शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची अधिक रेलचेल असते. सरावासाठीचा ‘सिंथेटिक ट्रॅक’ अपुरा आणि अरुंद आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियमच्या आवारात अद्याप कोणत्याही प्रकारचे खेळ खेळवण्यात आलेले दिसून येत नाही. ढोकाळीच्या मिनी क्रीडा स्टेडियमची उपलब्धता खेळाडूंसाठी अद्याप झालेली नाही. तसेच मुंब्रा-कौसा क्रीडांगणातील अनेक कामे आजही सुरू आहेत.
क्रीडांगणांवर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल भव्य-दिव्य नाटय़ संमेलनासाठी ठाणे शहरामध्ये जागाच उपलब्ध नसल्याने दादोजी कोंडदेव क्रीडांगणाच्या हिरवळीवर तंबू टाकून हे संमेलन साजरे करण्यात आले केवळ संमेलनच नव्हे तर वर्षांतून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडांगणावर आयोजित करण्यात येतात. अनेक वेळा खणलेले खड्डे आणि यावरील कार्यक्रमांमुळे मैदानाचीही दुरवस्था होऊन जाते. शहाराच्या मध्यवर्ती भागात असलेले दादोजी कोंडदेव क्रीडांगण पावसाळ्यात चार ते सहा महिने बंद राहते. तर पुढील तीन महिने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याने क्रीडांगण खेळाडूंना अत्यंत कमी प्रमाणात वापरायला मिळते. हे मैदान सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून द्यायचे नाही, असा निर्णय झालेला असतानाही कार्यक्रमांची रेलचेल कायम आहे.

प्रोत्साहन आणि पाठबळाची आवश्यकता..
महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन त्याचा विकास होण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे. खेळाडूंच्या नेमक्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या इतर शहरांमध्ये होणारी त्यांची फरफट थांबू शकेल. शासकीय संस्थांकडून पुरेशी मदत मिळत नसल्याने अनेक वेळा क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंना राजकीय मंडळींच्या आश्रयास जावे लागते आणि त्यामुळे त्यांच्या खेळावरही त्याचा परिणाम होत असतो. हे टाळण्यासाठी शासकीय स्तरावर अत्यंत दर्जेदार सुविधांची उपलब्धता या खेळाडूंसाठी करून देण्यात यावी.