27 February 2021

News Flash

पालिका कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बदलीच्या भीतीने मुख्यालयातच फिनाइल प्राशन

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बदलीच्या भीतीने मुख्यालयातच फिनाइल प्राशन

करवसुलीतील लक्ष्य गाठण्यात अपयश आल्याने आणण्यात आलेल्या बदलीच्या प्रस्तावाची कुणकुण लागल्याने भीतीने उल्हासनगर पालिकेतील एका कर्मचाऱ्याने पालिका मुख्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. या कर्मचाऱ्याने फिनाइल प्राशन केल्याचे समजताच अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.

उल्हासनगर महापालिकेच्या कर विभागात कार्यरत असलेले दयाराम ढोबळे यांनी दुपारी एकच्या सुमारास पालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर असताना फिनाइल प्राशन केले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच  त्यांनी ढोबळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

ढोबळे यांनी हे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, बदलीच्या भीतीने त्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे. उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीत वाढ करण्यासाठी पालिका आयुक्तांनी यंदा करवसुलीवर विशेष भर दिला आहे. त्यासाठी कर निर्धारण आणि संकलन विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी यांना लक्ष्य देण्यात आले होते. ते लक्ष्य पूर्ण न झाल्यास कारवाईची टांगती तलवारही होती. ढोबळे यांचे लक्ष्य पूर्ण न झाल्याने अन्यत्र कुठेतरी बदली होईल, अशी भीती त्यांच्या मनात कित्येक दिवसांपासून होती. यातूनच त्यांनी आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई होतच राहील. तसेच बदलीच्या कारवाईवर आत्महत्येचा प्रयत्न होत असेल तर काम करणे मुश्कील होईल.   – राजेंद्र निंबाळकर, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 2:04 am

Web Title: municipal corporation employee suicide attempt in thane
Next Stories
1 मेट्रोमार्गालगत बस स्थानके
2 मद्यपी चालकांवर ठाण्यात कारवाई
3 ठाण्यात मार्च अखेपर्यंत तेजस्विनी बसगाडय़ा
Just Now!
X