26 October 2020

News Flash

हत्येचा बदला हत्येने

नालासोपारा येथे राहणाऱ्या प्रवीण दिवेकर याने २०१४ मध्ये याच परिसरात राहणाऱ्या मंगेश यादव याची हत्या केली होती.

प्रतिकात्मक छायाचित्र

 

पित्याच्या मारेकऱ्याचा मुलाकडून खून

दोन वर्षांपूर्वी झालेल्या पित्याच्या हत्येचा बदला एका तरुणाने शुक्रवारी घेतला. भरदुपारी नालासोपारा पश्चिम येथे प्रवीण दिवेकर या इस्टेट एजंटची चॉपरने वार करून हत्या करण्यात आली. प्रवीणने दोन वर्षांपूर्वी मंगेश यादव याची हत्या केली होती. त्यामुळे मंगेश यादव यांचा मुलगा विशालने दिवेकरची हत्या करून बदला घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

नालासोपारा येथे राहणाऱ्या प्रवीण दिवेकर याने २०१४ मध्ये याच परिसरात राहणाऱ्या मंगेश यादव याची हत्या केली होती. या हत्येच्या आरोपावरून नालासोपारा पोलिसांनी दिवेकर याला अटक केली होती. त्या वेळी मृत मंगेश यादव याचा मुलगा विशाल याने वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली होती. एक वर्षांपूर्वीच मंगेश दिवेकर जामिनावर सुटला होता. दररोज दुपारी प्रवीण आपल्या मुलीला शाळेतून आणायला जात असे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास मुलीला आणण्यासाठी फनफिएस्टा भागातून जात असताना दबा धरून बसलेल्या विशाल आणि त्याच्या एका साथीदाराने त्याच्यावर चॉपरने वार केले. प्रवीणला उपचारासाठी नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला.

नोव्हेंबर महिन्यात प्रवीण जामिनावर सुटून आला होता. त्या वेळी आरोपी विशाल यादव याने आपल्या अन्य दोन मित्रांसह मंगेश दिवेकर याच्यावर कुऱ्हाडीने वार केले होते. त्या वेळी तो थोडक्यात बचावला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूपूर्वी प्रवीणने आपल्या पत्नीला विशालने हत्या केल्याची माहिती दिली, असे पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्यात विशालने प्रवीणवर हल्ला केला, तेव्हापासून तो फरार होता. आम्ही त्याचा शोध घेत होतो, असेही तोटेवाड यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 3:40 am

Web Title: murder case in vasai
Next Stories
1 पापडखिंड धरणाबाबत नागरिकांकडून सूचना
2 स्वत:ची पाणीपुरवठा योजना उभारणारे गाव!
3 मनपसंत गृहरचनेची ठाण्यात मुभा!
Just Now!
X