ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात नवविवाहितेची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला शनिवारी रात्री वागळे पोलिसांनी नाहूर येथून अटक केली. दीपेश दोधडे (२३) असे या आरोपीचे नाव असून तो ठाण्यातील लोकमान्य नगर येथे राहणारा आहे. एकतर्फी प्रेमातून दीपेशने प्रियांकाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी दीपेश याला न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे.
ठाण्यात राहणाऱ्या प्रियांकाचा २८ एप्रिल रोजी कल्याणच्या प्रमोद खराडे यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर मंगळवारी ती प्रथमच माहेरी आली होती. ज्ञानसाधना महाविद्यालयात पदवीची परीक्षा देण्यासाठी ती घरी आली होती. त्यावेळी तिचा खून झाला होता.