News Flash

बादलीत बुडवून मुलाची हत्या

सकाळी चार वर्षांचा पियुष शेजाऱ्यांकडे खेळायला गेला होता.

नालासोपारा येथे सावत्र पित्याने चार वर्षांच्या मुलाची पाण्यात बुडवून हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शेजारच्या घरात खेळायला गेला म्हणून राग आल्याने त्याने हे कृत्य केले. आरोपी विकास जैस्वाल (२५) हा नालासोपारा पुर्वेच्या संतोषभुवन येथे पत्नीसह रहात होता. त्याच्या पत्नीला पहिल्या पतीपासून तीन मुले होती. शुक्रवारी जैस्वालची पत्नी वसईला कामाला गेली होती. त्यावेळी आरोपी विकास आपल्या तीन सावत्र मुलांसोबत घरी होता.

सकाळी चार वर्षांचा पियुष शेजाऱ्यांकडे खेळायला गेला होता. याचा राग आल्याने जैस्वाल याने पियुषला झाडूने मारहाण केली. आणि नंतर न्हाणीघरात नेऊन बादलीत बुडवले. यावेळी पियुषच्या तोंडातून फेस आला  आणि तो गतप्राण झाला. जैस्वालने या घटनेची कुणाला वाच्यता न करण्याची धमकी दोन्ही मुलांना दिली. आणि पियुष खेळतांना पाण्यात बुडून मरण पावला असा बनाव त्याने रचला. परंतु तुळींज पोलिसांना विकास याचा  सशंय आल्याने त्यांनी मुलांकडे चौकशी केली आणि त्यांनी या हत्येच्या प्रकाराची माहिती दिली.

जैस्वाल हा कॅटिरगचे काम करतो. तो घरी सावत्र मुलांचा सांभाळ करायचा. परंतु तो नेहमी या मुलांना अमानुष मारहाण करत असे.  जैस्वाल याला  हत्येच्या गुन्ह्यात अटक केली असल्याची माहिती तुळींजचे पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 1:47 am

Web Title: murder in vasai
Next Stories
1 पोलीस उपअधीक्षक कार्यालयात आत्मदहन करणाऱ्या तरुणाचा मृत्यू
2 आंबिवली रेल्वे स्थानकाला ‘चिमणी’चा धोका
3 अवैध प्रवासी वाहतूक बेधडक सुरूच!
Just Now!
X