बोईसर पोलिसांनी केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

बोईसर येथे पतीच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या तांत्रिक महिलेच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या आरोपी महिलने आणखी दोन जणांची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. त्या दोन मृतदेहांचे सांगाडे शोधण्याचे काम सुरू आहे.

Pune, Citizens rewarded, missing school girl,
पुणे : बेपत्ता शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्तांकडून बक्षीस
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

बोईसर पूर्वेच्या दांडीपाडा येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पालघर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या कुंटणखान्यावर छापा घालून चार मुलींची सुटका केली आणि हा कुंटणखाना चालवणाऱ्या सविता भारती (४२) या महिलेसह एका गिऱ्हाईकास अटक केली. ही महिला तांत्रिक असल्याचे समजले आणि तिने तीन हत्या केल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. पोलिसांनी शोध घेतला असता तिच्या घराच्या शौचालयाच्या टाकीत पोलिसांना सांगाडा मिळाला. हा सांगाडा तिचा पती सहदेव याचा होता. सविता आणि तिच्या प्रियकराने २००४ मध्ये सहदेवची हत्या करून त्याचा मृतदेह शौचालयाच्या टाकीच टाकला होता. ही टाकी सिमेंट लावून कायमस्वरूपी बंद केली होती. सविता आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमसंबंधाची माहिती सहदेवला मिळाली होती. त्याशिवाय सविताच्या कुंटणखान्यालाही त्याचा विरोध होता. त्यामुळे प्रियकराच्या मदतीने तिने सहदेवची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हत्या प्रकरणात सविताच्या मुलाचाही समावेश असल्याचा संशय आहे. हा मुलगा आता २५ वर्षांचा असून तो बोईसरमध्ये वेगळा राहतो. त्याचीही पोलीस चौकशी करणार आहेत.

सध्या आरोपी सविता पोलीस कोठडीत असून तिने आणखी दोन जणांच्या हत्येची कबुली दिली आहे. यापैकी एक हत्या एका बंगाली गिऱ्हाईकाची असून दुसरी हत्या नरबळीसाठी केल्याचा संशय आहे. पोलिसांनी शौचालयाच्या टाकीत सांगाडा सापडला होता. त्यामुळे घर आणि परिसरात मृतदेह पुरून ठेवले आहेत का त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या महिलेच्या घरात जादूटोणा करण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

तीन अल्पवयीन मुलींची सुटका

तांत्रिक आरोपी महिला सविता भारतीच्या कुंटणखान्यातून शुक्रवारी पोलिसांनी तीन अल्पवीयन मुलींची सुटका केली. या मुली ७ ते ९ वष्रे वयोगटातील आहे. या मुलींना वेश्याव्यवसायात आणण्याचा तिचा प्रयत्न होता. आरोपीवर पिटा कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.