News Flash

अभिनय कट्टय़ावर अभिनय व संगीताची जुगलबंदी

या ‘स्वरामृत’ कार्यक्रमात भक्तिगीते, भावगीते, चित्रपटातील गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले.

अभिनय कट्टय़ावर रविवारी बालकलाकारांनी विविध कलेचे सादरीकरण केले. यावेळी एकपात्री तसेच अभिनयाबरोबरच मराठी व हिंदी गाण्यांचा ‘स्वरामृत’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. ‘शाळा बालकलाकारां’ची या सदराखाली मुलांनी सादरीकरणांची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून ती सादर केली. यावेळी दिलीप नामजोशी आणि प्रमोद जोशी या वादकांसमवेत चंद्रशेखर दामले आणि ओमकार दामले यांनी मराठी आणि हिंदी गाणी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

या ‘स्वरामृत’ कार्यक्रमात भक्तिगीते, भावगीते, चित्रपटातील गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन मधुमती दामले यांनी केले. तर अक्षरा गुप्ते, अद्वैत मापगांवकर यांनी अनुक्रमे ‘प्रयोग शाळेत बेडूक’ आणि ‘राँग कनेक्शन’ या विनोदी एकपात्री सादर करून प्रेक्षकांना पोट धरून हसवले. सानवी भोसले, कैवल्य गावंडे, यांनी ‘जा रे जा रे पावसा’ आणि ‘आयला रेनबो बघ रेनबो’ या द्विपात्री सादर केल्या. त्यानंतर शाळा बालकलाकारांची या सदरात विद्यार्थ्यांनी ‘धर्मयुद्ध’ हे बालनाटय़ सादर केले.

वैभव जाधव आणि रोहित आयरे यांनी ‘डॉ. आणि पेशंट’ ही द्विपात्री सादर केली. शिवानी देशमुख हिने ‘भूतानं पछाडल’ या गाण्याच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2016 1:09 am

Web Title: musical and acting duet in thane
टॅग : Thane
Next Stories
1 उद्योगक्षेत्रात नव्या वादाला सुरुवात
2 डोंबिवलीतील केमिकल कंपन्या इतरत्र हलविण्यासाठी लवकरच धोरण – सुभाष देसाई
3 डोंबिवलीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट; पाच ठार, ८० हून अधिक जखमी
Just Now!
X