News Flash

Coronavirus : मुजफ्फर हुसेन यांना करोना

गेल्या महिन्याभरापासून मुजफर हुसेन हे पक्ष वाढीच्या कामासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर होते.

भाईंदर : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष मुजफर हुसेन यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी स्वत:ला गृह विलगीकरण करून घेतले आहे. गेल्या महिन्याभरापासून मुजफर हुसेन हे पक्ष वाढीच्या कामासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यात पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे आणि गेल्या आठवडय़ात ते नाशिक दौऱ्यावरून परतले होते. याच दरम्यान त्यांना करोनाची लागण झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या नागरिकांना त्यांनी करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:44 am

Web Title: muzaffar hussain test positive for coronavirus zws 70
Next Stories
1 ठाणे जिल्ह्यात १,५६८ नवे रुग्ण, २६ जणांचा मृत्यू
2 ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना करोनाची बाधा
3 ठाण्यात करोना रुग्णाची आत्महत्या
Just Now!
X