19 March 2019

News Flash

अपहरण करून व्यापाऱ्याची हत्या

नालासोपारा येथून अपहरण करण्यात आलेल्या कापड व्यापाऱ्याचा मृतदेह भिवंडीच्या पडघा येथे सापडला.

प्रतिनिधिक छायाचित्र

नालासोपारा येथून अपहरण करण्यात आलेल्या कापड व्यापाऱ्याचा मृतदेह भिवंडीच्या पडघा येथे सापडला. व्यवसायातील आर्थिक वादातून ही हत्या झाली आहे. नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी या प्रकरणात हयगय केल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी रविवारी तुळींज पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.

नरेंद्र मिश्रा (३२) हे नालासोपारा येथील संखेश्वनर नगरात पत्नी दिप्ती आणि दोन मुलांसह राहत होते. ४ मार्चपासून ते बेपत्ता होते. ८ मार्च रोजी भिवंडी पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळला. हा मृतदेह नरेंद्रचा असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. ४ मार्च रोजी नरेंद्रच्या पत्नीने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

नरेंद्रने पाच वर्षांपूर्वी नालासोपारा येथील रोहीत सिंग याला कपडय़ाचा कच्चा माल उधारीवर दिला होता. त्याचे ८ लाख रुपये येणे बाकी होते. ४ मार्च रोजी रोहीतने नरेंद्रला पैसे घेण्यासाठी बोलावले आणि त्याचे अपहरण केले. नालासोपारा येथील द्वारका हॉटेलमधून नरेंद्रचे अपहरण करण्यात आले होते. त्याचे सीसीटीव्ही चित्रण मिळाले असून, आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहे.

First Published on March 12, 2018 4:56 am

Web Title: nalasopara businessman killed after kidnapped