|| भगवान मंडलिक

महाराष्ट्रातील ३५० प्रजातींच्या नावनिश्चितीसाठी तज्ज्ञांची समिती

Uddhav Thackeray Speech
Uddhav Thackeray : “गद्दारांच्या देशा, गुंडांच्या देशा, लाचारांच्या देशा ही आता महाराष्ट्राची ओळख होत चालली आहे”
Raj Thackeray on marathi bhasha din
“लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन…”, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट!
sanjay raut slams devendra fadnavis (1)
“मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण हे फडणवीसांना माहीत नसेल तर..”, संजय राऊत यांची टीका
Imtiyaz Jaleel Answer to Navneet Rana
“नवनीत राणांसारखे लोक नथुराम गोडसेच्या प्रवृत्तीचे, आम्ही अशा..”; इम्तियाज जलील यांची टीका

महाराष्ट्रातील ३५० प्रजातींच्या फुलपाखरांची मराठीतून नावे निश्चित करण्यासाठी शासनाच्या ‘महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळा’ने फुलपाखरू क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासकांची एक समिती स्थापन केली आहे. प्राणी-पक्ष्यांप्रमाणे फुलपाखरांची नावे सामान्यांना पटकन कळावीत तसेच फुलपाखरे सर्वाच्या परिचयाची व्हावीत, या उद्देशातून समिती फुलपाखरांची मराठीतील सामान्यातील सामान्य नावे निश्चित करणार आहे, असे समितीमधील एक तज्ज्ञाने सांगितले.

महाराष्ट्रात ३५० प्रजातींची फुलपाखरे आढळतात. या फुलपाखरांची ओळख शास्त्रीय किंवा सामान्य इंग्रजी नावाने होते. किचकट नावांमुळे सामान्यांना फुलपाखरांच्या प्रजाती ओळखणे अवघड होते. फुलपाखरे जैवविविधतेमधील महत्त्वपूर्ण घटक आहेत. फुलपाखरे सामान्य रहिवासी, अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतूंमध्ये विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती अवतीभोवती दिसतात. पण त्यांची ओळख अभ्यासकांव्यतिरिक्त सामान्यांना नसते. अशी फुलपाखरे सामान्यांना मराठी नावाने ओळखता यावीत यावर ही समिती काम करणार आहे, असे फुलपाखरू अभ्यासक व समिती सदस्य दिवाकर ठोंबरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आणि समितीचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत वडतकर, हेमंत ओगले, दिवाकर ठोंबरे आणि ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’तील फुलपाखरू तज्ज्ञ डॉ. राजू कसंबे फुलपाखरांच्या मराठी नामकरणासाठी काम करणार आहेत. सर्व समिती सदस्य मागील अनेक र्वष फुलपाखरांचे संवर्धन, जतन, त्यांच्या प्रजाती या विषयावर अभ्यास करीत आहेत. पुणे येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ कार्यरत आहे.

मागील पाच ते सहा वर्षांत ३५० फुलपाखरांपैकी २७५ फुलपाखरांची मराठीतून नावे आपण निश्चित केली. ती जैवविविधता मंडळाकडे पाठविली आहेत. दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई, अर्नाळा, वसई, भायखळा राणीचा बाग असा एक दिवशीचा ८५ किमीचा ‘फुलपाखरे शोध आणि त्यांची जीवन पद्धती’ याचा अभ्यास करण्यासाठी दौरा आयोजित केला होता. यावेळी ‘ब्लु ग्लाझी टायगर’ या नवीन प्रजातीचा शोध लागला होता.    – दिवाकर ठोंबरे, फुलपाखरूतज्ज्ञ

विष्ठेवर बसणारा ‘नवाब’

भारतातील अनेक फुलपाखरांची नावे ब्रिटिश काळात ठरवण्यात आली आहेत. यातील काही फुलपाखरांना शास्त्रीय नावे देण्यात आली तर, काही फुलपाखरांची नावे पाहिल्यास त्यात भारतीय संस्कृतीबद्दलचा द्वेषही झळकतो. विष्ठेवर बसणाऱ्या एका राजबिंड फुलपाखराला ब्रिटिशांनी ‘नवाब’ नाव ठेवले आहे. अशा अनेक देखण्या फुलपाखरांना ब्रिटिश फुलपाखरूतज्ज्ञांनी चीड आणणारी नावे ठेवली आहेत.