News Flash

मिरवणाऱ्या ‘नामधारी’ वाहनांच्या संख्येत वाढ

भविष्यात अशा नामधारी वाहनांची संख्या वाढून त्याचा गैरफायदा घेतला जाईल, अशी भीती व्यक्त आहे.

पालिका, नगरसेवकांच्या नावाचा गैरफायदा घेणारे मोकाट

पदावर असोत वा नसोत मात्र गेल्या काही दिवसांत माजी नगरसेवक, सभापती, पालिका अधिकारी आणि विविध पक्षांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अशा नावाच्या पाटय़ा किंवा स्टिकर आपल्या चारचाकी वाहनांवर लावून मिरवणाऱ्यांची संख्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरात वाढली आहे. त्यावर कोणतीही कारवाई करता येत नसल्याने त्या नामफलकांचा चांगलाच गैरफायदा हे वाहनधारक घेत असल्याचे दिसून आले आहे.

आजच्या घडीला नगरसेवक, समाजसेवक, माजी नगरसेवक, सभापती, अधिकारी अशा अनेक नावांचे फलक असलेल्या चारचाकी आपल्याला पाहायला मिळतात. असे फलक लावण्याचा अधिकार नसतानाही त्याचा आज सर्रास वापर होताना दिसतो आहे. अशी अनेक वाहने सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, वाहतूक पोलिसांच्या तपासणीत वा शासकीय कार्यालये किंवा पार्किंगच्या ठिकाणी गैरफायदा घेताना दिसतात. अशाच प्रकारे पालिका प्रशासनाच्या किंवा पालिकेचे नाव असलेले स्टिकरही अनेक चारचाकी वाहनांवर पाहायला मिळते. अंबरनाथ नगरपालिकेचे नाव असलेल्या अशा अनेक चारचाकी अंबरनाथ शहरात फिरताना आपल्याला दिसतात. त्यामुळे अनेकदा त्याचा गैरफायदा घेतला जातो. वाहतूक पोलीस किंवा इतर पोलिसांच्या आपत्कालीन तपासणीतही अशी वाहने विशेष व्यक्ती असल्याच्या आविर्भावात वाहने चालवताना दिसतात. अशी नावे लावून अनेक वाहने काळ्या फिल्मही गाडीवर चढवताना दिसतात. त्यामुळे अशा नामधारी वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आता पुढे येताना दिसते आहे. याबाबत पालिकेचे अधिकारी यांना विचारले असता पालिका अशा कोणत्याही प्रकारचे फलक वा स्टिकर वाटत नाही. पदसिद्ध अधिकारी आणि प्रमुखांना फलक दिले जातात. मात्र इतर वाहनांच्या स्टिकरला पालिका जबाबदार नाही. त्यामुळे भविष्यात अशा नामधारी वाहनांची संख्या वाढून त्याचा गैरफायदा घेतला जाईल, अशी भीती व्यक्त आहे.

पत्रकार आणि पोलिसांच्या नावे स्टिकर लावून फिरणाऱ्या बोगस वाहनांवर कारवाई करता येते. मात्र नगरसेवक आणि अन्य अध्यक्ष तसेच इतर नावांवर कारवाई करता येत नाही. तसा कायदाही नाही, त्यामुळे त्यांच्यावर र्निबध घालणे कठीण आहे.

– नंदकिशोर नाईक, अधिकारी, प्रादेशिक परिवहन कल्याण.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 3:12 am

Web Title: name plate illegal use in ambernath badlapur
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांनी समृद्ध झाले..
2 फुलपाखरांच्या जगात : कॉमन सेलर..
3 ‘एमएमआरडीए’द्वारे भाजपचा सेनेला शह!
Just Now!
X