‘फिश टँक’मधील मासे विहिरी, तलावांत सोडल्यामुळे नैसर्गिक जैवविविधता धोक्यात

हौसेमुळे किंवा फेंगशुईसारख्या समजुतींमुळे घरात फिश टँकमध्ये मत्स्यपालनाचे प्रमाण वाढू लागले असले, तरी जेव्हा कालांतराने हे मासे विहिरी किंवा तलावांत सोडले जातात, तेव्हा तेथील जैवविविधतेसाठी घातक ठरतात, असे निरीक्षण जलचरांच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ठाण्यातील काही पर्यावरण संस्थांनी तलाव आणि विहिरींचे सविस्तर सर्वेक्षण केले असता यामध्ये परदेशी जातींचे मासे, साप, कासव मोठय़ा प्रमाणावर सापडत असल्याचे आणि त्यामुळे जैवविविधता धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

फेंगशुईमुळे आणि गृहसजावटीच्या वाढत्या महत्त्वामुळे गेल्या काही वर्षांत मत्स्यबाजारपेठेला चांगले दिवस आले आहेत. गोल्ड आणि आरवाना या माशांना फेंगशुई शास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. घरातील फिशटँकमध्ये गोल्ड प्रजातीचे तीन मासे ठेवल्यास आर्थिक भरभराट होते, असा एक समज आहे. त्यामुळे त्यांच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे. मात्र फिश टँकमध्ये मासे सांभाळण्याची हौस फिटल्यावर अनेक जण त्यांना शहरातील तलावांत किंवा विहिरींत सोडतात, असे निरीक्षण वाइल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशनने नोंदवले आहे. आफ्रिकन कॅटफिश, पिऱ्हाना, गोल्ड, अ‍ॅलिगेटर गार, फ्लॉरॉन, तिलापिया अशा परदेशी प्रजातींचे मासे ठाण्यातील तलाव, विहिरींमध्ये आढळू लागले आहेत. त्यामुळे मत्स्यपालनाची नागरिकांची हौस मूळ नैसर्गिक प्रजातींच्या अधिवासास धोका ठरत आहे, असे संस्थेच्या आदित्य पाटील यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी ठाण्यात आफ्रिकन बॉल पायथॉन हा आफ्रिकेतील साप रस्त्यावर सापडला. हे पाहून धक्का बसलेल्या प्राणीमित्रांनी परदेशी जातीच्या सापांची तस्करी थांबवण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

मासे, कासवांच्या अतिक्रमणात वाढ

ठाण्यातील तलावांच्या काठी अमेरिकन रेड इयर स्लायडर ही कासवांची प्रजात मोठय़ा प्रमाणात आढळत असल्याचे संस्थेचे निरीक्षण आहे. विहिरीतील किंवा तलावातील पाणी स्वच्छ करण्याचे काम गावठी कासवे करततात. मात्र सिंगापुरी, मलेशियन कासवांकडून तलाव, विहिरींतील पाण्यात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे गावठी कासवांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. तसेच परदेशी जातीच्या कासव व माशांचा आहार देखील अधिक असल्याने मूळ देशी जातीच्या मासे, कासवांसाठी परिसंस्थेतील अन्न अपुरे पडत आहे. त्यामुळे त्यांच्या वास्तव्यात अडथळा निर्माण होतो आहे, असे आदित्य पाटील यांनी सांगितले.

परदेशी जातीच्या प्राण्यांचे संरक्षण आणि त्यांच्यापासून मूळ प्रजातीच्या प्राण्यांचे रक्षण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध १९६० हा कायदा सर्वच प्राण्यांसाठी लागू आहे. मात्र परदेशी प्रजातींच्या प्राण्यांना देशात बंदी असावी, असा कायदा अस्तित्वात असणे महत्त्वाचे आहे. परदेशी जातीच्या प्राण्यांच्या देशात वाढलेल्या वास्तव्यामुळे २५ टक्के मूळच्या प्राण्यांचे प्रमाण घटले आहे. परदेशी प्राण्यांची आयात देशात थांबवण्यासाठी कडक कायदा आणल्यास मूळची जैवविविधता टिकून राहण्यास मदत होईल.

मीत आशर, अ‍ॅनिमल वेलफेअर ऑफिसर, अ‍ॅनिमल बोर्ड ऑफ इंडिया, भारत सरकार