25 February 2021

News Flash

सीवूड येथे टॉवरची आग विझवताना अग्निशमन दलाचे सात जवान जखमी

नवी मुंबईतही एका टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.

काळचौकी परिसरातील एका इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग लागल्याची घटना ताजी असताना, नवी मुंबईतही एका टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली. नवी मुंबईत नेरुळच्या सीवूड सेक्टर ४४ मध्ये सी होम्स या टॉवरमध्ये शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास आग भडकली होती.

टॉवरच्या २० आणि २१ व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच नेरुळ अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही आग विझवताना अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सी होम्स या २१ मजली टॉवरमध्ये दोन मजल्यांवर लागलेली आग अधिक पसरु नये, यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. ही आग विझवताना सात जवान जखमी झाले. तीन तासांनी १०.३०च्या सुमारास ही आग नियंत्रणात आली.  टॉवरच्या २० आणि २१ व्या मजल्यावर ड्युप्लेक्स फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कुटुंबाना सुरक्षित खाली उतरवण्यात आले. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 8:59 am

Web Title: navi mumbai seawoods fire breaks out at high rise apartment dmp 82
Next Stories
1 कल्याणमध्ये शिवसेना नगरसेविकेच्या पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार
2 ठाण्यात आठ बोगस डॉक्टरांवर कारवाई
3 लोकलगर्दीचे १४३ बळी
Just Now!
X