28 February 2021

News Flash

‘राष्ट्रवादीच्या आमदाराकडून भाजपचा प्रचार’

काँग्रेस नेते दामोदर शिंगडा यांचा आरोप; पक्षाध्याक्षांकडे तक्रार

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

काँग्रेस नेते दामोदर शिंगडा यांचा आरोप; पक्षाध्याक्षांकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनी उघडपणे भाजपचा प्रचार केला, असा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार दामोदर शिंगडा यांनी केला आहे. ठाकूर यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शिंगडा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी असूनही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेस थेट पाचव्या स्थानावर गेला.

पालघर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून डहाणू येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. डहाणूतील राष्ट्रवादीचे नेते आनंद ठाकूर विधान परिषदेवर आमदार आहेत. पोटनिवडणुकीत शिवसेना, बविआच्या उमेदवारांनी सव्वादोन ते अडीच लाखांची मते मिळवली असताना शिंगडा यांना जेमतेम ४८ हजार मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसचा प्रचार न करता उघडपणे भाजपाचा प्रचार केल्याचा आरोप  दामोदर शिंगडा यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे वसई-विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांच्याविरोधात खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या प्रकरणात आमदार आनंद ठाकूर यांची चौकशी करण्यात येईल, अशी धमकी भाजपाने त्यांना दिल्याचा आरोप शिंगडा यांनी केला आहे, तसेच भाजपाकडून ठाकूर यांना भाजपाचा प्रचार करण्यासाठी मोठी रक्कमही दिली गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आनंद ठाकूर यांनी पक्षविरोधी कारवाई केली असून पक्षाला बदनाम केले आहे. त्यांच्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिंगडा यांनी शरद पवारांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.        – दामोदर शिंगडा, काँग्रेस उमेदवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 12:35 am

Web Title: ncp and bjp in palghar election
Next Stories
1 विवाहाचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक
2 मोबाइल मनोऱ्याविरोधात रोष
3 करिअरमंत्र जाणण्यासाठी यशवंतांची गर्दी
Just Now!
X