पालकमंत्र्यांकडून आढावा

वसई : वसई-विरार शहरात करोना  संसर्गाचा प्रसार  हा वेगाने होत असून नवे करोनाबाधित व मृत्यूच्या घटना समोर आहेत. यामुळे ज्या भागातून करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील अशी नऊ ठिकाणे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आली आहेत.

करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी वसईच्या तहसीलदार कार्यालयात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीस पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे,  खासदार राजेंद्र गावित, महापौर प्रवीण शेट्टी, बोईसरचे आमदार राजेश पाटील, वैद्यकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

यावेळी पालिका प्रशासन जिल्हा प्रशासन यांच्या तर्फे करोनाच्या पाश्वभूमीवर करण्यात येणारम्य़ा विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला

पालघर जिल्ह्यात आजवर १८ करोना बाधित रुग्ण आढळून आहेत त्यात तिघांचा बळी गेला आहे. यात  सर्वाधिक रुग्ण हे वसईतील असून  एव्हरशाईन सिटी येथील चार ठिकाणे, कृष्णा टाऊनशिप, गोकुळ टाऊनशिप, साईनगर परिसर , सेंट्रल पार्क, राजोडी अशा ठिकाणी आढळून आल्याने ही सर्व ठिकाणे हॉटस्पॉट तयार आहेत. तसेच जिल्ह्यात वाढता करोनाचा प्रसार पाहता  सर्दी,  खोकला, ताप अशी लक्षण आढळून येणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे यासाठी ३०० पथकांच्या साह्य़ाने तपासणी केली जाणार आहे. यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आहे, असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

डहाणूत केंद्रासाठी प्रयत्न

सध्या जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांचे नमुने तपासणी करण्यासाठी मुंबईच्या  रुग्णालयात पाठवावे लागतात. जर पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी डहाणू येथील डॉक्टर महाले यांचे रुग्णालय आहे त्या रुग्णालयात करोनाग्रस्त रुग्णांची तपासणी केंद्र तयार करण्यासाठी प्रय सुरू आहेत त्याला जर केंद्र शासनाची मान्यता मिळाल करोनाग्रस्तांची नमुने तपासणी लवकरात लवकर करता येतील.

तीन खासगी रुग्णालयांत १०० खाटांची सोय

सध्या स्थितीत करोनाग्रस्तांसाठी वसईतील विविध तीन खासगी रुग्णालयात १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी  शहरात १४ व्हेन्टिलेटर उपलब्ध असून  २० व्हेन्टिलेटर ग्रामीण भागासाठी उपलब्ध आहेत. आता करोनाच्या रुग्णांना कस्तुरबा आणि जसलोक रुग्णालयात न्यावे लागते. यात अधिक वेळ वाया जातो. यासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्याची सोय प्रशासनातर्फे करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.