News Flash

कल्याणमधील शाळेत सिलिंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू, १२ जखमी

कल्याण पूर्व येथील मलंग परिसरात ही शाळा आहे

कल्याणमधील आर्य गुरूकुल शाळेत गुरूवारी झालेल्या स्फोटात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण पूर्व येथील मलंग परिसरात ही शाळा आहे. आज शाळेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी फुगे फुगविण्यासाठी नायट्रोजन सिलेंडर गॅस मागविण्यात आलेला होता. फुगे फुगविताना अचानक या सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट झाला तेव्हा सिलेंडरच्या आजुबाजूला उभी असणारी आठ ते दहा मुले स्फोटात जखमी झाली. जखमींना कल्याण आणि डोंबिवलीतील एपीईएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या स्फोटात गंभीर झालेल्या फुगे फुगवणाऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 3:11 pm

Web Title: nitrogen cylinder blast in kalyan school four students injured
टॅग : Mishap
Next Stories
1 व्यापारी संपामुळे कल्याणकर वेठीस
2 केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांची महिलांशी अरेरावी
3 नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांकडून १०० टन कचरा संकलित
Just Now!
X