18 January 2020

News Flash

ठाण्यातील काही भागांत आज वीज नाही

या कामांमुळे शहरातील काही भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

 

ठाणे येथील वर्तकनगर भागातील पोखरण रस्त्याच्या रुंदीकरणास अडसर ठरणाऱ्या उच्चदाब वीजवाहिन्यांच्या मनोऱ्यांचे स्थलांतर करण्याचे काम शुक्रवारी हाती घेण्यात आले आहे. या कामांमुळे शहरातील काही भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

कोरम मॉल, देव कॉर्पोरेशन, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, व्होल्टास, ज्युपिटर रुग्णाालय, एक्सएलओ मशीन्स, जे. के. केमिकल, सिंघानिया स्कूल, रेमंड कॅडबरी, ब्लू स्टार, ग्लॅक्सो कंपनी, कौशल्या रुग्णालय यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत हा वीजपुरवठा बंद राहील, तसेच गडकरी उपविभागातील तारांगण सोसायटी, विम्बल्डन पार्क, सिद्धेश्वर तलाव, चंदनवाडी, नितीन कंपनी सव्‍‌र्हिस रोड, प्रेस्टीज गार्डन, गणेशवाडी, अल्मेडा रोड, नुरीरोड दर्गा, उदयनगर, लुईसवाडी, रामचंद्रनगर, पूर्णा सोसायटी, टेकडी बंगला, पाटीलवाडी, टी.एम.सी. पम्प्िंाग यांचाही वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.

First Published on June 24, 2016 1:53 am

Web Title: no electricity in thane some areas
Next Stories
1 आंतरराष्ट्रीय योगदिन कोल्हापुरात उत्साहात
2 ७७६ रस्ते खड्डय़ांतच!
3 गुन्हे वृत्त : संशयाने घेतला पत्नीचा बळी
Just Now!
X