21 September 2018

News Flash

३६ तासांनंतरही वीज नाही!

सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास वसई-विरार शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला.

विजेचे खांब पाण्यात गेले, तर विजेच्या ताराही खाली आल्या होत्या

वसई : तब्बल ३६ तास उलटून गेल्यानंतर वीज न आल्याने वसईकरांचे अतोनात हाल झाले. वीज नसल्याने टीव्ही, इंटरनेट, मोबाइल आदी साधनेही बंद पडली. त्यामुळे वसईकरांचा बाहेरील जगाशी अक्षरश: संपर्क तुटला होता.

HOT DEALS
  • Sony Xperia XA1 Dual 32 GB (White)
    ₹ 17895 MRP ₹ 20990 -15%
    ₹1790 Cashback
  • Micromax Vdeo 2 4G
    ₹ 4650 MRP ₹ 5499 -15%
    ₹465 Cashback

सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास वसई-विरार शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला. तो ३६ तास उलटूनही पूर्ववत झाला नव्हता. यामुळे वसईकरांचे प्रचंड हाल झाले. घरातील इन्वहर्टर बंद पडले. ज्यांच्याकडे जनरेटेर होते, त्यांचेही डिझेल संपले. रस्ते बंद असल्याने डिझेलही आणता आले नाही. वीज नसल्याने सर्वाचे मोबाईल बंद पडले. टीव्ही, इंटरनेटही बंद असल्याने बाहेरील जगाशी संपर्कच तुटला होता.

बुधवारी पाऊस थांबला होता. मात्र पाणी ओसरले नव्हते. त्यामुळे लोकांना घरातच अडकून राहावे लागले होते. वसईतील हाहाकाराच्या बातम्या टीव्हीवर होत्या. त्यामुळे वसईतील रहिवाशांचे बाहेर राहणारे नातेवाईक चिंतीत होते. मात्र मोबाइल बंद असल्याने विचारपूसही करता येत नव्हती. रुग्णालयांनाही वीज नसल्याचा फटका बसला. एटीएम केंद्रे बंद होती. त्यामुळे लोकांना पैसा काढता आला. नाही. वसई पूर्वेला असलेल्या औद्य्ोगिक वसाहतीमधील कारखाने आणि कंपन्या वीजेअभावी बंद होते. वसई हे मुंबईच्या आर्थिक राजधानीपासून जवळच आहे. अशावेळी ३६ तास वीज जाते हे भूषणावह नाही, असे जागरूक नागरिक वसईचे चिन्मय गवाणकर यांनी सांगितले. वीज नसल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on July 12, 2018 2:59 am

Web Title: no power supply internet in vasai over last 36 hours due to heavy rain