04 July 2020

News Flash

ठाण्याच्या काही भागात आज पाणी नाही

पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

महापालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती, मुख्य जलवाहिनीवरील पाणी गळती रोखणे आणि सॅटिसच्या कामात बाधित होणारी जलवाहिनी स्थलांतरित करणे अशी कामे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे आज, शनिवार सकाळपासून शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

शनिवार ६ जून रोजी सकाळी ९ ते रविवार, ७ जून रोजी सकाळी ९ या वेळेत शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यात घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, जॉन्सन, इटर्निटी, समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर तलाव परिसर, जेल परिसर, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, कळव्यातील काही भाग, कोपरी परिसरातील कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगर, नातू कॉलनी, सावरकरनगर, वाल्मीकीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, क्रिष्णानगर, स्वामी समर्थ मठ या भागांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2020 12:50 am

Web Title: no water in some parts of thane today abn 97
Next Stories
1 बाजारपेठा फुलू लागल्या!
2 बाजार समित्या गुंडाळण्यात अपयश!
3 बदलापूर : करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ, शुक्रवारी ७ नवीन रुग्णांची भर
Just Now!
X