News Flash

ध्वनिप्रदूषणाचा ‘उल्हास’

उल्हासनगरमधील मिरवणुकांमध्ये पोलिसांकडून ६५ डेसिबल्स मर्यादेची नोंद

ध्वनिप्रदूषणाचा ‘उल्हास’
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

उल्हासनगरमधील मिरवणुकांमध्ये पोलिसांकडून ६५ डेसिबल्स मर्यादेची नोंद

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी डॉल्बीमुक्त उत्सव असा प्रचार करत पोलीस आणि पालिका प्रशासनाने प्रयत्न केले असले तरी सात दिवसांच्या गौरी-गणपती विसर्जन मिरवणुकांचा आवाज चढाच असल्याचे समोर आले आहे.

उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ चे उपायमुक्त अंकित गोयल आणि उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या प्रयत्नाने यंदाचा उत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. पालिका प्रशासनाने मंडळांना दोन हजारांचे पोरितोषिक जाहीर केले होते, तरीही गणेश विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या पुणेरी ढोल आणि बँड पार्टींचा दणदणाट होता.

बहुतेक ठिकाणी हा आवाज १०० डेसिबल्सपर्यंत गेल्याची नोंद झाली आहे. नव्याने आलेल्या आवाज मापनाच्या मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने अनेकोंनी विविध चौकातील आवाजाच्या पातळीची नोंद केली होती. ती सरासरी ८० ते ९० डेसिबल्सच्या दरम्यान होती. मात्र पोलिसांकडून ही पातळी ६० ते ६५ डेसिबल्स असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर प्रबोधन करूनही यंदाच्या आवाज मोठाच राहिला असून ध्वनिप्रदूषण वाढले नसले तरी ते कमीही झाले नसल्याचे समोर आले आहे. अनेक मिरवणुकी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचेही अनेक ठिकाणी दिसून आले. यंदा ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या मंडळांना परवानगी  दिली नव्हती.

पोलीस उशिरा पोहोचले

नुकतेच गौरी आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. यात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या मोठी असते. या विसर्जन दरम्यान पोलिसांना तीन विविध ठिकाणच्या ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र पोलीस तिथे जाऊन ध्वनिमर्यादा तपासण्याधीच मिरवणुका संपलेल्या होत्या. त्यामुळे कोणत्याही मंडळाची मोठय़ा आवाजाची पातळी पोलिसांना मोजता आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 2:30 am

Web Title: noise pollution at thane
Next Stories
1 पापलेट स्वस्त, मच्छीमार चिंताग्रस्त!
2 वसईतील धोकादायक इमारतींची फेरतपासणी
3 ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रावर पालिकेचा ताबा
Just Now!
X