आवाजाची पातळी ८० वरून ५५ डेसिबलवर

ठाणे : करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली असल्याने देशांतर्गत वाहतूक बंद आहे. वाहतूक बंद असल्याने ठाणे शहरातील ध्वनी प्रदूषण घटले असल्याची माहिती नुकतीच एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. ठाणे शहरतील विविध भागांत एरवी ८५ डेसिबलपेक्षा जास्त असणाऱ्या आवाजाची पातळी गेल्या काही दिवसांपासून ५५ डेसिबलपर्यंत खाली आल्याचे या सर्वेक्षणात उघड झाले आहे. टाळेबंदीमुळे शहरातील आवाजाच्या पातळीत घट झाल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केले आहे.

Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
tadoba andhari tiger reserve marathi news, nagzira sanctuary marathi news
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात
What caused decline in production of cashew nuts in Konkan Unseasonal rains along with the impact of low rates
विश्लेषण : कोकणात ‘काजू बी’च्या उत्पादनात घट कशामुळे झाली? अवकाळी पावसाबरोबरच कमी दराचा फटका?
Nashik water
निम्म्या नाशिकमध्ये बुधवारी पुन्हा पाणी बंद

ठाणे शहर हे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असल्याने ठाण्याहून मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या आणि मुंबई दिशेकडे येणाऱ्या वाहनांची संख्या दररोज मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे दिवसभर हे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेले पाहायला मिळते. तसेच  शहरातील अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने तेथेही वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या वाहतूक कोंडीमुळे आणि वाहनांच्या आवाजामुळे शहरातील आवाज मर्यादा ८५ डेसिबलपेक्षा अधिक असते. त्यातच गेल्या वर्षभरापासून शहरात मेट्रोचे काम सुरू असल्याने शहरातील ध्वनी प्रदूषणात वाढ झाली आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून देशात करोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व वाहतूक ठप्प झाली असून नागरिक केवळ अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील ध्वनी प्रदूषण कमी झाले असल्याचे नुकतेच डॉ. महेश बेडेकर यांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. एरवी ८० डेसिबलपर्यंत असणारी शहराची आवाजाची पातळी सध्या सरासरी ५५ डेसिबल्सपर्यंत खाली आली आहे.

टाळेबंदीमुळे शहरातील ध्वनी प्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे सध्या शहरात सध्या विविध पक्ष्यांचा किलबिलाट  ऐकायला मिळत आहे. करोनाच्या टाळेबंदीनंतरही शहरातील नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला आणि विनाकारण हॉर्न वाजविणे थांबविले तर ध्वनी प्रदूषणात आणखी घट होईल.

– डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते

सर्वेक्षणाची ठिकाणे              आवाजाची पातळी 

बेडेकर रुग्णालय                     ५०-५५ डेसिबल

गोखले रोड                               ४५-५० डेसिबल

राम मारुती रोड                       ५० डेसिबल

कोपरीपूल                               ६५-७० डेसिबल

आनंद सिनेमागृह                   ५५-६० डेसिबल

सद्गुरू उद्यान, कोपरी           ५५ डेसिबल

तीन हात नाका                      ७०-७५ डेसिबल

जे.के. सिंघानिया शाळा           ५५-५८ डेसिबल