News Flash

येता गुलाबी थंडी, महाग होती अंडी

डाळी आणि भाज्यांचे दर गेले काही दिवस चढणीच्या वाटेवर असताना आता अंडीही महाग झाली आहेत.

अंडी

१५ दिवसांत डझनामागे सहा रुपयांची वाढ
दर वाढूनही मागणीत २०-२५% वाढ
डाळी आणि भाज्यांचे दर गेले काही दिवस चढणीच्या वाटेवर असताना आता अंडीही महाग झाली आहेत. नोव्हेंबरमधील अवकाळी पावसामुळे काहीशा विलंबाने मुंबई-ठाण्यात दाखल झालेल्या थंडीची चाहूल लागताच अंडय़ांचे दर डझनमागे ६ ते १२ रुपयांनी वाढून ६० रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र, थंडीच्या हंगामात अंडय़ांचा फडशा पाडण्याचे प्रमाण वाढत असून गेल्या काही दिवसांत कल्याण, डोंबिवली परिसरातील अंडय़ांच्या मागणीत जवळपास दुप्पट वाढ झाल्याचे पुरवठादारांनी सांगितले.
अंडय़ांमधून भरपूर प्रथिने मिळत असल्याने थंडीच्या वातावरणात अंडय़ांच्या मागणीत सर्वसाधारणपणे वाढ होत असते. त्यामुळे अंडय़ांच्या दरातही वाढ होते. हीच बाब यंदाही दिसून येत आहे. सध्या किरकोळ बाजारात ६० रुपयांना (प्रति डझन) अंडी विकण्यात येत आहेत. १५ ते २० दिवसांपूर्वी हा दर ४८ ते ५४ असा होता, असे डोंबिवलीतील अंडय़ांचे घाऊक व्यापारी कुमारसेन नाडर यांनी सांगितले. तर, धान्यांच्या किमतीत वाढ झाल्यांमुळे कोंबडय़ांचे खाद्यही महागले आहे. त्याचा परिणाम अंडय़ांच्या दरांवर दिसून येत आहे, असे घाऊक व्यापारी सुरेश शेटे यांनी म्हटले.
दरात वाढत झाली असली तरी, अंडय़ांच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ‘आठ ते दहा दिवसांपूर्वी दिवसाला अडीच लाख अंडय़ांची विक्री होती. हिवाळ्यामुळे अंडय़ांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली असून, आता चार लाख अंडय़ांची विक्री होत आहे,’ असे नाडर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:17 am

Web Title: now egg are expensive due to winter season
Next Stories
1 आगरी महोत्सवात महागडय़ा गाडय़ांची विक्री
2 नवअंबरनाथकर प्रदूषणाच्या विळख्यात
3 कल्याण-डोंबिवली पालिकेचे बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष
Just Now!
X