करोनाकाळात घरबागेकडे अनेकांचा कल; ऑनलाइन रोपांच्या खरेदीत वाढ

निखिल अहिरे

ठाणे : करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीकाळात जिल्ह्यातील अनेक रोपवाटिकाधारकांना मोठय़ा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले होते. शहरांमधील गृहसंकुलांची बांधकामे थांबल्याने आणि नागरिकांनी रोपांच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याने रोपवाटिकांची आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत होते. दुसऱ्या लाटेनंतर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत मात्र अनेकांचा कल घरात बागा फुलविण्याकडे दिसू लागला असून यामुळे रोपवाटिका तसेच ऑनलाइन रोपांच्या खरेदीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?

घरातील बाल्कनीत, अंगणात, गच्चीवर मेथी, पालक, कोथिंबिरीसारख्या भाज्या उगविण्याचा प्रयत्न अनेकांकडून होत असल्याने या भाज्यांची उत्तम दर्जाची बियाणे खरेदीतही अलीकडे वाढ झाली आहे. जिल्ह्य़ातील शहरी भागात नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलांमधील बागेत गवताचे गालिचे, शोभेची, फुलांची आणि सावलीची झाडे मोठय़ा प्रमाणात लावली जातात. त्याचबरोबर रस्त्यांच्या दुभाजकांवर शोभिवंत झाडे तर दुतर्फा सावलीच्या झाडांचे रोपण करण्यात येते. नागरिकही आपल्या घरातील कुडय़ांमध्ये फुलझाडांची रोपे लावत असतात. मागील वर्षभरापासून या रोपांची विक्री मंदावली होती. बराच काळ रोपवाटिका बंद असल्याने असंख्य रोपे कुजून गेली. रोपांची विक्रीच होत नसल्याने अनेक छोटय़ा व्यावसायिकांनी आपल्या रोपवाटिका बंद केल्या. करोनाच्या दुसऱ्या लाटेतील टाळेबंदीत अनेक जण बागकामांकडे वळले. त्यामुळे रोपांची खरेदी वाढली आहे. त्याचबरोबर पावसाळा सुरू झाल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यावरणप्रेमींकडून वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जात आहेत. या गोष्टींमुळे सर्व प्रकारच्या रोपांची चांगली विक्री होत असून रोपवाटिकांचे अर्थचक्र पुन्हा सुरू झाले आहे.

करोनाकाळात रोपवाटिकाधारकांना मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर सर्व प्रकारची बागकामे सुरू झाली आहेत. गृहसंकुलांमधील बागकामे पुन्हा सुरू झाल्याने सर्व प्रकारच्या रोपांची गतवर्षीच्या तुलनेत चांगली विक्री होत आहे.

– प्रसाद मोरे, सदस्य, महाराष्ट्र नर्सरीमॅन संघटना