काशीबाईंच्या वंशजांचा ‘बाजीराव मस्तानी’वर आक्षेप
संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित हिंदी चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ ऐतिहासिक तथ्याच्या विपर्यास्तामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई जोशी यांच्या वंशजांनीही त्यात उडी घेतली आहे. कल्याणातील पारनाका येथील जोशी वाडय़ात काशीबाई यांचे दहा वर्षे वास्तव्य होते. याच वाडय़ात सध्या रहात असलेले काशीबाई यांचे वंशज विश्वास जोशी यांनी हा सिनेमा तथ्यहीन असल्याची टीका केली आहे. काशीबाई जोशी यांच्या पायाला इसब झाल्याने त्या लंगडत चालत. असे असताना या सिनेमात त्यांना एका गाण्यावर नृत्य करताना दाखवून निर्मात्यांनी थट्टा केल्याची टीका विश्वास जोशी यांनी केली आहे.
कल्याणातील पारनाका येथील जोशी वाडय़ात बाजीराव पेशवे यांची पत्नी काशीबाई जोशी यांचे वास्तव्य होते. १७२० ते १७३० या काळात बाजीरावांचे मेहुणे रामचंद्र जोशी हे कल्याणला सुभेदार होते. काशीबाई यांचे वडील महादजीपंत जोशी यांनी पेशवाईपदाच्या कामी पेशव्यांना सहकार्य केल्याने जोशांचे ऋण बाळाजी विश्वनाथ (बाजीराव पेशवे यांचे वडील) यांनी लक्षात घेऊन महादजीपंतांची मुलगी काशीबाई (लाडूबाई) हिला आपली सून करून घेतले. बाजीराव पेशवे यांचा विवाह काशीबाईंबरोबर १७७५ मध्ये कल्याणात झाला. पारनाक्यावरील जोशी वाडय़ात हा विवाह झाला. त्यावेळी लग्नकार्ये घरातच होत. वाडय़ांमध्ये ४-४ दिवस लग्नकार्याचा समारंभ चालत असे. पेशव्यांचे लग्न साहजिकच थाटामाटात होणार यात शंका नाही. पेशवे कल्याणला येणार म्हणून वऱ्हाड उतरण्यासाठी सोय म्हणून १७१४-१५ मध्ये पारनाक्यावर जोशी वाडा बांधण्यात आला. आज या वाडय़ाची जागा टोलेजंग इमारतीने घेतली आहे. श्रीनिवास साठे यांनी संपादित केलेल्या ‘कल्याण शहराचा सांस्कृतिक इतिहास’ या पुस्तकात या वाडय़ाची आणि विवाहाची विस्तृत माहिती दिली आहे.
काशीबाई जोशी यांची आज आठवी-नववी पिढी याच वाडय़ाच्या नव्या वास्तूत वास्तव्यास आहे. काशीबाईंचे वंशज विश्वास जोशी यांनी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाला आक्षेप घेतला आहे. काशीबाई यांच्या पायाला इसब झाला होता. त्यामुळे त्यांना नाचता येणे शक्यच नव्हते. परंतु या चित्रपटात काशीबाई ‘पिंगा’ गाण्यावर ठेका धरत असल्याचे दाखविण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.

डॉ. आनंदीबाई जोशी काशीबाई यांच्या वंशज
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या काशीबाई जोशी यांच्या वंशज आहेत. महिलांचे जग ‘चूल आणि मूल’ एवढय़ापुरतेच असलेल्या काळात अमेरिकेत जाऊन त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. आनंदीबाई यांचा जन्म कल्याणातच झाला. पुढे त्यांचे लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झाले.

MP Dhananjay Mahadik, Leads Campaign for Mahayuti, Sanjay Mandlik, Kolhapur lok sabha seat, Rajarampuri peth, Shahupuri peth, people united to campaign,
संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पदफेरीत राजारामपूरी, शाहूपूरी व्यापारी पेठ एकवटली
Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

अष्टकोनी चौरंग त्रिविक्रम मंदिरात
बाजीराव पेशवे यांच्या विवाहात त्यांना मधुपर्काच्या समारंभामध्ये जोशी कुटुंबीयांकडून संगमरवरी एकसंध अष्टकोनी चौरंग भेट देण्यात आला. कालांतराने जोशी कुटुंबीयांनी हा चौरंग पारनाका परिसरातील श्री त्रिविक्रम देवस्थानाला दिला. त्रिविक्रम मंदिरात काचेच्या बंद कपाटात हा चौरंग ठेवण्यात आला आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष गो.पू.भिडे सांगतात.