News Flash

ठाकुर्लीत लोकलच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

वाघेला हे अहमदाबादहून डोंबिवलीत पाहुणे आले होते. शतपावली करण्यासाठी संध्याकाळी ते घराबाहेर पडले होते.

कुर्ली रेल्वे स्थानकातील फाटक ओलांडत असताना लोकलने दिलेल्या धडकेत मंगळवारी संध्याकाळी जगदीश वाघेला (६०) या ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या आठवडय़ात रेल्वे फाटक ओलांडत असताना शंकर नारायण या ज्येष्ठ नागरिकाचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला होता.
वाघेला हे अहमदाबादहून डोंबिवलीत पाहुणे आले होते. शतपावली करण्यासाठी संध्याकाळी ते घराबाहेर पडले होते.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील फाटक ओलांडून ते रेल्वे मार्गातून जात होते. त्यांना लोकलने जोराची धडक दिली. त्यांना तात्काळ पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गाला वळण आहे. त्यामुळे सीएसटीकडून येणारी लोकल पादचाऱ्याला दिसत नाही. हे फाटक बंद करण्यात येणार आहे. या
भागात पालिका आणि रेल्वेच्या सहकार्याने उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 12:01 am

Web Title: old man killed after being hit by train
Next Stories
1 परमार यांनी पैसे वाटप केलेले विभाग : अग्निशमन दल, तहसील कार्यालयातही पैसे वाटप
2 महिनाभरात फेरीवाला मुक्ती!
3 ठाण्यात साडेपाच हेक्टर जागेवर जैवविविधता उद्यान
Just Now!
X