नऊ महिन्यांनंतर घाईने खर्चाचा प्रस्ताव मंजूर
महापौर क्रीडा स्पर्धावर करण्यात आलेल्या लाखो रुपये खर्चाची प्रकरणे बाहेर येत आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय महापौर चषक लंगडी स्पर्धेसाठी क्रीडा विभागाने तब्बल १९ लाख १६ हजार ८२५ रुपयांचा चुराडा केला असल्याची बाब उघडकीला आली आहे. नऊ महिन्यांनंतर या अवाढव्य खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीत घाईने मंजूर करून घेण्यात आला.
आचारसंहिता जाहीर झाली तर या खर्चाचा प्रस्ताव मंजूर करणे शक्य होणार नसल्याने हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून घेतला. तीन वर्षांत महापालिकेतर्फे महापौरांच्या नावाने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धावर तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. क्रीडा विभाग, काही अधिकारी आणि महापालिकेतील महत्त्वाचे पदाधिकारी यांच्या संगनमताने हा क्रीडा स्पर्धाचा खर्च वाढविण्यात येत आहे, अशी तक्रार दक्ष नागरिक मनोज कुलकर्णी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली आहे.

लंगडी स्पर्धेचा खर्च
’आमंत्रण पत्रिका, प्रमाणपत्र :
१ लाख ३० हजार
’सन्मानचिन्ह:१ लाख ९० हजार
’मैदान खर्च: १ लाख ९९ हजार
’आसन व्यवस्था : २ लाख
’शाल, पुष्पगुच्छ : १ लाख ५४ हजार
’मंडप सजावट : २ लाख
’भोजन, नाष्टा: ३ लाख ९७ हजार
’प्रचार फलक : १ लाख ९० हजार