कल्याणमध्ये सोमवारी सकाळी गॅसने भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. येथील आधारवाडी चौकातील घरात सिलेंडरमधून गॅसची गळती झाल्यामुळे हा स्फोट झाला. सिलेंडरमधून गॅसची गळती होत असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे अनेकजण या स्फोटाचे बळी ठरले. यामध्ये घरातील ६५ वर्षीय ताराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, अन्य नऊजण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, स्फोटाच्या हादऱ्याने संपूर्ण घराच्या भिंतीची दुरावस्था झाली आहे. सिलेंडरमधील गॅसची गळती नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही.
डोंबिवलीत भयकंप..
भोपाळसारखी दुर्घटना झाल्यानंतरच शहाणे होणार?