News Flash

कर्णावती एक्स्प्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू

कर्णावती एक्स्प्रेसने धडक दिल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा भाईंदर रेल्वे स्थानकात मृत्यू झाला.

 

कर्णावती एक्स्प्रेसने धडक दिल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा भाईंदर रेल्वे स्थानकात मृत्यू झाला. दुर्गेश वानखेडे असे त्यांचे नाव असून ते मुंबईतील मालाड येथे राहणारे होते. मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वानखेडे फलाटाच्या कडेला उभे असताना वेगाने येणाऱ्या कर्णावती एक्स्प्रेस गाडीकडे त्यांचे लक्ष नव्हते, असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिलेला नाही. फलाट क्रमांक पाच व सहा यांच्यामधील दोन रुळांच्यामध्ये वानखेडे यांचा मृतदेह सापडला असून या घटनेचा तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे अपघात वाढले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 12:50 am

Web Title: one dead due karnavati train accident
Next Stories
1 लुईसवाडीमध्ये आगीत कार भस्मसात
2 मीरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईवर विहिरींचा उतारा
3 ठाणे स्टेशन रस्त्यावर भुयारी बाजारपेठ ; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेची योजना
Just Now!
X