News Flash

जिल्ह्य़ातील पोलीस दल करोनाच्या विळख्यात

आणखी एका पोलिसाचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

आणखी एका पोलिसाचा मृत्यू

वसई : पालघर जिल्ह्य़ातील पोलीस दलाला असलेला करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ  लागला आहे. सोमवारी वालीव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जितेंद्र भालेराव यांचा करोनामुळे मृत्यू झाला. मागील २२ दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. वालीव पोलीस ठाण्यातील हा दुसरा करोनाबळी आहे.

वसई पूर्वेच्या वालीव पोलीस ठाण्यात जितेंद्र भालेराव (३८) हे पोलीस नाईक पदावर काम करत होते. त्यांना २० जून रोजी करोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नालासोपारा येथील पालिकेने अधिग्रहित केलेल्या रिद्धिविनायक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते मृत्यूशी झुंज देत होते. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. भालेराव हे मूळचे मुरबाड येथील असून ते कल्याण येथे राहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. वालीव पोलीस ठाण्यातील हा दुसरा बळी ठरला आहे. मागील महिन्यात किरण साळुंखे यांचादेखील करोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलीस ठाण्यावर शोककळा पसरली आहे.

पालघर जिल्ह्य़ात १३५ पोलीस करोनाबाधित

पालघर जिल्ह्य़ात एकूण २३ पोलीस ठाणी आहेत. आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांतील १३५ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १०३ पोलीस करोनामुक्त झाले आहेत, तर ३० पोलिसांवर अद्याप उपचार सुरू आहेत. त्यात माणिकपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांचाही समावेश आहे. माणिकपूर आणि वसई पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचारी अलगीकरणात गेल्यामुळे पोलीस ठाण्यात शुकशुकाट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:20 am

Web Title: one more cop of valiv police station dies of covid 19 in vasai zws 70
Next Stories
1 कोविड रुग्णालयांच्या निर्मितीस दिरंगाई
2 मीरा-भाईंदरमध्ये टाळेबंदीचा फज्जा
3 वसईत दूषित पाण्याचे संकट
Just Now!
X