18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी ठाण्यातून एकास अटक

२००० हजार रुपयांच्या १० लाख ७४ हजार ५३७ नोटा हस्तगत.

ठाणे | Updated: June 18, 2017 7:57 PM

प्रतीकात्मक छायाचित्र

भारतीय चलनातील बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने एका व्यक्तीस अटक केली असून त्याच्याकडून २००० हजार रुपयांच्या १० लाख ७४ हजार ५३७ नोटा हस्तगत केल्या आहेत. कळवा चौक येथून संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. भारतीय चलनातील नोटा हस्तगत केल्यानंतर या मागे कुठली टोळी आहे का याचा शोध आता ठाणे पोलीस घेत आहेत.

जुन्या नोटा बंद झाल्यानंतर नवीन नोटा चलनात आल्या. त्यानंतर जुन्या नोटा बदलून नवीन नोटा घेण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून गजाआड केले. हे सत्र सुरु असतानाच भारतीय चलनातील बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने एका व्यक्तीस अटक केली असून त्याच्याकडून २००० हजार रुपयांच्या १० लाख ७४ हजारच्या ५३७ नोटा हस्तगत केल्या आहेत. दशरथप्रसाद श्रीवास असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on June 18, 2017 7:53 pm

Web Title: one person arrested for carrying fake currency of 2000 notes in thane