18 February 2020

News Flash

ऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक

तक्रारदाराने अर्नाळा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार : विरारमध्ये एका व्यक्तीची ऑनलाइन पक्षी खरेदीच्या नादात ३५ हजार रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडीस आला आहे.  या प्रकरणी पक्षीप्रेमीने अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हा पक्षी प्रेमी आहे. २४ डिसेंबर रोजी त्याने आरोपीकडून ऑरेंज विंग अ‍ॅमेझॉन नावाचा पक्षी विकत मागितला होता. त्यासाठी तक्रारदाराने आरोपीच्या खात्यात ऑनलाइन स्वरूपात ३५ हजार रुपये पाठवले. त्यांनतर तक्रारदार पक्षी भेटून देण्याचे आश्वासन दिले होते.

या घटनेनंतर आरोपीने तक्रारदाराला आजतागायत पक्षी न देता त्याचे पैसेही परत केले नाही. त्यामुळे तक्रारदाराने अर्नाळा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. नागरिकांनी ऑनलाइन प्रलोभनाला बळी पडून नये तसेच खात्रीशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन अर्नाळा पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेटे यांनी केले आहे.

First Published on January 23, 2020 1:17 am

Web Title: online bird shop fraud akp 94
Next Stories
1 तरुणीचे लैंगिक शोषण, आरोपीला अटक
2 परिवहन प्राधिकरणाचा ‘गुगली’
3 ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मधून बक्षिसांची लूट
Just Now!
X