15 July 2020

News Flash

पिकपाण्याविषयी ऑनलाइन मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी युटय़ुबवरील चित्रफितींचा उपयोग

शेतकऱ्यांसाठी युटय़ुबवरील चित्रफितींचा उपयोग

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : करोनाच्या संकटात अनेक व्यवस्था कोलमडून पडल्या असल्या तरी याच काळात अनेक नव्या व्यवस्था निर्माण झाल्या असून शेतकऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या शासनाच्या कृषी विभागानेही करोनाच्या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी आता शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध चित्रफिती तयार केल्या असून युटय़ुबच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना करोनाच्या संकटातही कृषी विभागाचे विविध प्रकारचे मार्गदर्शन मिळत आहे.

उन्हाळ्याच्या अखेरीस शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागतात. तसेच कृषी विभागाकडून बियाणांची मागणी, खतांची उपलब्धता, कृषी कर्ज, योजना आणि अनुदानाच्या प्रक्रिया करण्यास सुरूवात होते. मात्र यंदाच्या खरीप हंगामावर करोनाचे सावट आहे. यामुळे सार्वजनिक आणि गर्दीची ठिकाणे बंद झाल्याने अनेक नियोजीत व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत. उन्हाळ्याच्या अखेरीस कृषी विभागाकडून शिबिर आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे, खत, बियाणांच्या जाती, त्यांची वाढ, बीज प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले जाते. यंदा करोनाच्या संकटात हे उपक्रमही बंद पडले आहेत. मात्र, राज्य शासनाच्या ठाणे जिल्ह्याच्या कृषी विभागाने यावरही मात करत शेतकऱ्यांना शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आधुनिक मार्ग निवडला आहे. सध्या शेतकरी स्मार्ट होऊ  लागला आहे. अनेक शेतकरी व्हाट्सअपच्या माध्यमातून बियाणांची मागणी करतात. हीच बाब ओळखत यंदा कृषी विभागाने शेतीपूर्व तयारीच्या मार्गदर्शनासाठी ‘कृषी विभाग, ठाणे’ हे युटय़ुब खाते तयार केले आहे.

बियाणे आणि विमा

खरीप हंगामाची तयारी, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, भात बीज प्रक्रिया, खरीप हंगामातील भात लागवड, चारसुत्री भात लागवड पद्धत अशा चित्रफितींचा समावेश आहे. त्यासह मृदा नमुने चाचणी आणि त्याचे फायदे, शेतकरी अपघात विमा योजना कशी आहे, अंतर्गत पडीक जमिनीवर आणि बांधावर फळ लागवड कशी करावी, कृषी माल निर्यातीच्या संधी कोणत्या, अशा विविध विषयांचा यात समावेश आहे. सध्याच्या घडीला १० विषयांवरच्या चित्रफिती अपलोड करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 3:12 am

Web Title: online guidance on crop watering for farmers zws 70
Next Stories
1 गोदामांमधील रुग्णालयांचा प्रस्ताव बारगळणार?
2 कचऱ्यामुळे ‘साथीं’ना निमंत्रण
3 करोनाकाळातही आयुक्तांच्या बंगल्याचे नूतनीकरण
Just Now!
X