News Flash

६० हजारासाठी हत्या, मृतदेहाचे त्याने केले ३०० तुकडे 

हत्येनंतर मृतदेह नष्ट करण्यासाठी पिंटूने गणेशच्या मृतदेहाचे तुकडे शौचालयाच्या टाकीत टाकले.

पोलिसांनी पिंटू शर्माला ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

केवळ ६० हजार रुपयांसाठी आपल्याच मित्राची हत्या करून सलग तीन दिवसात मृतदेहाचे ३०० तुकडे केल्याचा आणि माणुसकीला काळिमा फासणारा घृणास्पद प्रकार विरार परिसरात घडला. दुर्गंधीने ट्रस्ट सोसायटीच्या साफसफाई अभियानात हा प्रकार उघडकीस आला. निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आणि मृतदेहाचे तुकडे तुकडे करून विल्हेवाट लावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मृत गणेश कोल्हटकर (वय ५८, रा. मीरारोड, ठाणे) याचा मित्र आरोपी पिंटू शर्मा यांच्यात आर्थिक व्यवहार होता. विरारमध्ये पिंटूने काही महिन्याaपूर्वीच भाड्याने घर घेतले होते. गणेश आणि पिंटूमध्ये पैशाच्या व्यवहारातून वाद झाला. १ लाख ६० हजाराचे कर्ज पिंटूने घेतले. त्यापैकी ६० हजार फेडले. उर्वरित ६० हजार देण्याचा तगादा लावला. यामुळे पिंटूने मृत गणेशसोबत पार्टी केली आणि वाद उकरून काढत गणेशाची हत्या केली.

हत्येनंतर मृतदेह नष्ट करण्यासाठी पिंटूने गणेशच्या मृतदेहाचे टप्याटप्प्याने तीन दिवस ३०० तुकडे करून ते शौचालयाच्या टाकीत टाकले. दुर्गंधीचा त्रास सहन न झालेल्या सोसायटीच्या सदस्यांनी साफसफाई मोहीम राबविली. तेव्हा शौचालयाच्या टाकीत मासाचे गोळे आढळले आणि खुनाला वाचा फुटली. पोलिसांनी पिंटूला ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 9:47 pm

Web Title: only for 60 thousand he murdered friend and cut the dead body of 300 pieces
Next Stories
1 २९ गावांचा प्रश्न अनुत्तरीत!
2 फेरीवाल्यांचे नालासोपारा रेल्वे स्थानकात अतिक्रमण
3 विकासकामावरून भाजप-सेना नगरसेवकांमध्ये जुंपली
Just Now!
X