News Flash

शाळा बंद असल्याचा आदेश डावलल्याने १३ शाळांवर गुन्हा दाखल

तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संग्रहीत

तर क्रिकेट खेळणाऱ्या १९ जणांवर गुन्हे दाखल

विरार :  वसई विरार परिसरात मागील आठवड्यापासून करोना रुग्णाची संख्या वाढत असताना वसई विरार महानगरपालिकेने पुन्हा २४ फेब्रुवारीपासून ५ ते ८ वीच्या शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. असे असतानाही वसईतील काही खाजगी शाळांनी या नियामचे पालन न करत शाळा सुरु ठेवल्या होत्या. अशा १३ शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. या शाळांच्या विरोधात मनाई आदेश भंग केल्याने तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वसई पोलीस ठाण्यात नियम डावलून क्रिकेट खेळणाऱ्या  १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वसई गटशिक्षण अधिकारी माधवी तांडेल यांनी माहिती दिली की,  शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दुसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता वर्तवली जात असल्याने शासनाने पुन्हा २४ फेब, पासून ५ वी ते ८ च्या शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  याकरिता सर्व शाळांना शिक्षण विभागाकडून लेखी आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही काही शाळा या अनधिकृतपणे शासनाच्या आदेशाचे पालन न करता सुरु ठेवल्या जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. माहितीच्या आधारे पाहणी केल्या असता नालासोपारा परिसरातील १३ शाळा आम्हला आढळून आल्या. यावर आम्ही तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या  शाळा अ‍ॅनि  बेझेंट स्कूल मोरेगाव, दिशा अकादमी स्कूल प्रगती नगर, सर्वोदय बाल विद्यामंदिर मोरेगाव, गुरु गोविंद स्कूल मोरेगाव, सरस्वती स्कूल ओस्वालनगरी, सनशाईन स्कूल मोरेगाव, यशवंत स्कूल मोरेगाव, लॉर्ड इंग्लिश स्कूल प्रगती नगर, नवजीवन विद्यामंदिर प्रगतीनगर, द सेफियन्स स्कूल मोरेगाव, सेंट जॉन हाईस्कूल मोरेगाव, लायन आदर्श स्कूल आचोळे, राजीव गांधी स्कूल मोरेगाव या शाळांच्या संस्थापाकांवर शासनाचे मनाई आदेश भंग केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कुणालाही अटक करण्यात आली नाही.

वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाबोळा येथील मैदावावर मंगळवारी मनाई आदेश असतानाही नेटमध्ये क्रिकेटचे सामने सुरू होते. यावेळी पोलिसांनी कारवाई करत १९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये मुखपट्ट्याचा वापर न करणे, सामाजिक दुरीकारणाचा फज्जा उडविणे आणि शासनाच्या मनाई आदेशाचे उलंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 12:06 am

Web Title: orders to close schools filed against schools akp 94
Next Stories
1 शहरातील शाळांचा ऑनलाइन शिक्षणावर भर
2 अंतरसोवळ्याचे नियम पाळा, अन्यथा दंड भरा!
3 कलानींसाठी पुन्हा राष्ट्रवादीच्या पायघड्या
Just Now!
X