23 October 2020

News Flash

Coronavirus : करोनाचा कहर सुरूच

बाधितांची संख्या १ लाख ६० हजारांवर; उपचाराधीन रुग्णांची संख्या १८,५९८

(संग्रहित छायाचित्र)

बाधितांची संख्या १ लाख ६० हजारांवर; उपचाराधीन रुग्णांची संख्या १८,५९८

ठाणे : जिल्ह्य़ात करोनाचा कहर सुरूच असून सध्या दररोज १ हजार ६००हून अधिक रुग्ण आढळून येत आहे. करोनाची लागण झालेल्या एकूण बाधितांची संख्या १ लाख ६० हजार २७१वर पोहोचली आहे, तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही गेल्या पंधरवडय़ापासून वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्य़ात १८ हजार ५९८ करोना रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई ही तीन शहरे आघाडीवर असून तुलनेने इतर शहरांमध्ये सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ऑगस्ट महिन्यामध्ये काहीसा नियंत्रणात आलेला करोनाचा संसर्ग सप्टेंबर महिन्यात वेगाने वाढू लागला आहे. गेल्या २१ दिवसांमध्ये ३६ हजारांहून अधिक नवे करोना रुग्ण आढळून आल्यामुळे एकूण बाधितांच्या संख्येने १ लाख ६० हजारांचा टप्पा पार केला आहे.

कल्याण-डोंबिवली आघाडीवर

दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहर आघाडीवर असून या शहरात दररोज ४५०हून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील एकूण बाधितांची संख्या ३९ हजार १७२ वर पोहोचली आहेत. यापैकी ३३ हजार २५१ बाधित करोनामुक्त झाले असले तरी ५ हजार १४८ रुग्ण सध्या विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आतापर्यंत शहरातील ७७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मीरा-भाईंदर, ठाणे ग्रामीण पट्टय़ातही संसर्ग वाढताच

जिल्ह्य़ातील मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीण पट्टय़ातही करोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. मीरा-भाईंदर शहरात दररोज २०० ते २५० करोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या शहरातील एकूण बाधितांची संख्या १६ हजार ७०६वर पोहोचली आहे. त्यापैकी १ हजार ९२६ रुग्ण सध्या विविध ठिकाणी उपचार घेत आहेत, तर, ५१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण पट्टय़ातील शहरापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण या भागांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. ठाणे ग्रामीणमध्ये दररोज १५० ते २०० नवे करोना रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत ठाणे ग्रामीणमध्ये १२ हजार ७९१ रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी २ हजार ४४२ रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत.

बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरात  प्रमाण कमी

बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि भिवंडीत या शहरांमध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण काहीसे कमी आहे. या चारही शहरांमध्ये दररोज सुमारे २५ ते ७० रुग्ण आढळून येत आहेत. येथील सक्रिय रुग्णांचे प्रमाण ६००हून कमी आहे. उल्हासनगर शहरात ५८६, बदलापूरमध्ये ४८९, अंबरनाथमध्ये ३८१ आणि भिवंडीमध्ये २९७ रुग्ण उपचार घेत आहेत.

ठाण्यात उपचाराधीन रुग्णांच्या प्रमाणात वाढ

गेल्या २१ दिवसांपासून ठाणे शहरात दररोज ३५० ते ४००हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या ३३ हजार २०५ आहे. वाढत्या रुग्णांमुळे उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढले असून सध्या शहरात ३ हजार ७४५ रुग्ण उपचार घेत आहेत. आजतागायत शहरातील २८ हजार ५२० जण करोनामुक्त झाले असून ९३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 2:43 am

Web Title: over 1 lakh 60 thousand affected with coronavirus in thane district zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू
2 ठाणे महापालिकेच्या शाळा बंदच
3 वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर
Just Now!
X