News Flash

पालघरमध्ये आश्रमशाळा केली ‘सील’, 30 विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाला करोनाची लागण

करोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लागण मुलींना

पालघजवळील नंडोरे आदिवासी आश्रमशाळेत 30 विद्यार्थ्यांना व एका शिक्षकाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अलिकडेच जव्हार हिरडपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना करोनाची लागण झाल्यानंतर ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना व एका शिक्षकाला करोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने आश्रमशाळा सील केली आहे.

नंडोरे आश्रमशाळेत नववी ते बारावीचे वर्ग सुरू होते. काही विद्यार्थिनींना लक्षणे आढळून आल्यानंतर सुरुवातीला नऊ विद्यार्थींना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत पुढे आले. त्यानंतर 193 विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर एकूण 30 विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले असून एका शिक्षकालाही लागण झाली आहे.

34 शिक्षक या शाळेत शिकवत होते. करोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लागण मुलींना झाली आहे. या आश्रमशाळेतील 24 मुली करोना पॉझिटिव्ह असून सहा मुलेही बाधित आहेत. यातील नऊ मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगिकरण कक्ष स्थापन करून वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 1:53 pm

Web Title: palghar 30 students and one teacher coronavirus positive school sealed sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘ईडी’कडून कल्याणमधील विकासकाच्या चौकशीचा प्रयत्न
2 नव्या मेट्रो मार्गाचे स्वप्न धूसरच
3 रेल्वे स्थानकात घुसखोरी करणारे रिक्षाचालक गायब
Just Now!
X