News Flash

पालघरमध्ये अॅक्रिलिक कंपनीत भीषण आग

आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जाते. 

आगीचे नेमके कारण अस्पष्ट

पालघरमध्ये अॅक्रिलीक कंपनीत गुरुवारी सकाळी भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील वरई- सातीवली येथे ही कंपनी असून या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जाते.

वरई- सातीवली येथे वॉटर पार्क रायडर्स ही कंपनी असून या कंपनीत गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 2:11 pm

Web Title: palghar fire at company near mumbai ahmedabad highway fire tender on spot
Next Stories
1 प्लास्टिक पिशव्यांची धुळवड
2 ‘पब्जी’ पिचकारी, ‘डाएट’ पुरणपोळी
3 चिमण्यांची घरटी घोषणेपुरतीच!
Just Now!
X