पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच मोखाडा त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या मोरचोंडी गावाजवळील नदीला पूर आला आहे. त्या पुरात रस्ताच खचल्याने मोखाडा त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
एकीकडे रस्ता खचल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे अनेकांच्या घरांमध्येही पाणी घुसले होते. तसेच पावसामुळे नाशिक आणि मोखाड्याचा संपर्क तुटला आहे. मोखाडा तालुक्यात बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे या ठिकाणचा रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे अनेकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 11, 2019 2:59 pm